Realme चा नवीन मोबाईल फोन Realme 12x 5G लवकरच भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. हा नवा स्मार्टफोन एप्रिलच्या सुरुवातीच्या दिवसात भारतात लाँच केला जाईल. अखेर आज Realme कंपनीने या आपल्या आगामी स्मार्टफोन Realme 12X 5G च्या भारतीय लाँचची तारीख जाहीर केली आहे. त्याबरोबरच, फोनची अपेक्षित किंमत आणि स्पेसिफिकेशन्स देखील ऑनलाईन लीक झाले आहेत.
आगामी Realme 12X 5G फोन भारतात एप्रिलच्या सुरुवातीला लाँच केला जाणार आहे. या फोनचे प्रोडक्ट पेजही Flipkart शॉपिंग साइटवर लाईव्ह करण्यात आले आहे. फोनबद्दल अधिकृत घोषणा करताना कंपनीने म्हटले आहे की, Realme 12x 5G ची किंमत 2 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता उघड होईल. या फोनचा लॉन्च इव्हेंट ब्रँडच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर थेट पाहता येईल.
Realme 12X स्मार्टफोन चीनी बाजारात आधीच लाँच करण्यात आला आहे. फोनच्या 12GB RAM सह 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1499 युआन म्हणजे सुमारे 17,000 रुपये आहे. तर, 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1799 युआन म्हणजे सुमारे 20,000 रुपये आहे. त्यामुळे, Realme 12X भारतात देखील या रेंजमध्ये उपलब्ध करून दिला जाऊ शकतो, अशी अपेक्षा केली जात आहे.
वर सांगितल्याप्रमाणे, Realme 12x 5G आधीच चिनी बाजारात लाँच करण्यात आला आहे. Realme 12X स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच लांबीची फुल HD+ स्क्रीन आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येईल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, MediaTek Dimensity 6100+ octa-core प्रोसेसर देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये ‘डायनॅमिक बटण’ देखील दिले जाईल जे अनेक फंक्शन्ससाठी शॉर्टकट असेल. हा फोन IP54 रेटिंग, 3.5mm जॅक आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर यांसारख्या फीचर्सना देखील सपोर्ट करतो.
फोटोग्राफीसाठी Realme 12X मध्ये ड्युअल रियर कॅमेरा आहे. या बॅक कॅमेरा सेटअपमध्ये 50MP चा मुख्य सेन्सर आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोन 8MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, स्मार्टफोन 5,000 mAh बॅटरीला सपोर्ट करतो. भारतीय मॉडेलमध्ये 45W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान दिले जाईल.