Powerful फीचर्स बहुप्रतिक्षीत Realme 12 Pro 5G सिरीज अखेर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत। Tech News 

Powerful फीचर्स बहुप्रतिक्षीत Realme 12 Pro 5G सिरीज अखेर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत। Tech News 
HIGHLIGHTS

Realme 12 Pro सिरीज आज म्हणजेच 29 जानेवारी रोजी अखेर भारतात लाँच

Realme 12 Pro सिरीजची किंमत 25,999 रुपयांपासून सुरु

Realme 12 Pro 5G आणि Pro Plus 5G ची सेल 6 फेब्रुवारीला Flipkart वर सुरु होणार

मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेली Realme 12 Pro सिरीज आज म्हणजेच 29 जानेवारी रोजी अखेर भारतात लाँच करण्यात आली आहे. फोनचा लॉन्च इव्हेंट दुपारी 12 वाजतापासून सुरु झाला आहे, ज्यामधून ब्रँडच्या ‘नंबर’ सीरिजचे नवीन फोन भारतीय बाजारपेठेत सादर केले गेले आहेत. या सिरीजअंतर्गत Realme 12 Pro 5G आणि Realme 12 Pro+ 5G या भारतात लाँच झाले आहेत. हे स्मार्टफोन्स सबमरीन ब्लू आणि नेव्हिगेटर बेज या कलर ऑप्शन्ससह येतील. जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-

हे सुद्धा वाचा: आगामी Tecno Spark 20 स्मार्टफोन Amazon वर सूचीबद्ध, किंमत आणि Special फीचर्स झाले उघड। Tech News

Realme 12 Pro सिरीजची किंमत

Realme 12 Pro 5G दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनच्या 8GB+128GB व्हेरिएंटची किंमत 25,999 रुपये इतकी आहे. तर, Realme 12 Pro 5G, 8GB+256GB व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

Realme 12 Pro 5G Price

तर, दुसरीकडे Realme 12 Pro+ 5G तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. फोनच्या 8GB+128GB व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे. तर, Realme 12 Pro+ 5G, 8GB+256GB व्हेरिएंटची किंमत 31,999 रुपये इतकी आहे. तसेच, फोनच्या हाय 12GB+256GB व्हेरिएंटची किंमत 33,999 रुपये आहे. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, Realme 12 Pro 5G आणि Pro Plus 5G ची सेल 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर सुरू होईल.

Realme 12 Pro सिरीजचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

Realme 12 Pro 5G सिरीजच्या स्मार्टफोन्समध्ये 6.7-इंच लांबीचा OLED डिस्प्ले आहे. यासह जबरदस्त 120Hz रिफ्रेश रेट कर्व व्हिजन स्क्रीन, 240Hz कमाल टच सॅम्पलिंग रेट मिळेल. तर, दुसरीकडे Realme 12 Pro Plus 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच लांबीचा FHD+ OLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे.

प्रोसेसर

Realme 12 Pro 5G मध्ये 64-बिट ऑक्टा-कोर Qualcomm Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर आहे. तर, Realme 12 Pro Plus 5G फोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर असून 12GB पर्यंत रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेज आहे.

Realme 12 Pro 5G Design

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी Realme 12 Pro 5G फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 32MP टेलिफोटो लेन्स, 50MP मुख्य लेन्स आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आहे. सेल्फीसाठी 16MP कॅमेरा देण्यात आला आहे.

तर, Realme 12 Pro Plus 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात पहिला 50MP Sony IMX 890 सेन्सर, दुसरा 64MP टेलिफोटो सेन्सर आणि तिसरा 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी

वापरकर्त्यांना या मजबूत डिव्हाइसमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. चार्जिंगसाठी यात 67W SuperVOOC चार्जिंग सपोर्ट आहे. कंपनीने Realme 12 Pro Plus मध्ये मजबूत 5000mAh बॅटरी दिली आहे, जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo