Realme 12 Pro सीरीज भारतात ‘या’ दिवशी होणार लाँच, कंपनीने जारी केला टीजर Video। Tech News
Realme 12 Pro सीरीज भारतात लाँच होण्यासाठी सज्ज
कंपनीने ट्विट करून जानेवारीमध्ये Realme 12 Pro सीरीजच्या लाँचची पुष्टी केली आहे.
कंपनीने या ट्विटमध्ये एक टीझर Video देखील शेअर केला आहे.
बऱ्याच दिवसांपासून समोर येत असलेल्या लीक रिपोर्ट्समध्ये Realme 12 Pro सीरिजच्या स्मार्टफोन्सची माहिती समोर येत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Realme 12 Pro सीरीज भारतात लाँच होण्यासाठी सज्ज झाली आहे. होय, आता कंपनीने पुष्टी केली आहे की, ही सिरीज भारतात याच महिन्यात जानेवारी 2024 मध्ये लाँच केली जाईल. Realme ने या सिरीज लाँचसाठी एक टीझर व्हिडिओ देखील जारी करण्यात आला आहे. यामध्ये फोनची पहिली झलक पाहायला मिळते. टीजरमध्ये Realme 12 Pro सिरीजच्या काही स्पेक्सबद्दल देखील माहिती मिळेल.
हे सुद्धा वाचा: प्रायव्हसी होणार आणखी मजबूत! WhatsApp चे New फीचर रोल आउट, चॅटसोबत दिसणार महत्त्वाचे कॅप्शन। Tech News
Realme 12 Pro सीरीज जानेवारीमध्ये होणार लाँच
Realme India ने आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर अकाउंटवरून ट्विट करून जानेवारीमध्ये Realme 12 Pro सीरीजच्या लाँचची पुष्टी केली आहे. कंपनीने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “The moment is here! Revealing the master lens to revolutionize your visualization experience with the periscope camera.” त्याबरोबरच या ट्विटमध्ये “सिरीजच्या लाँच डेटचा युजर्सना अंदाज घेण्यास सांगितले आहे. लाँचच्या डेटचा अंदाज घेऊन ते बक्षिसे जिंकू शकतात.”
कंपनीने या ट्विटमध्ये एक टीझर Video देखील शेअर केला आहे. XX जानेवारीला भेटू असे त्यात म्हटले आहे. यावरून हे स्पष्ट झाले आहे की, Realme 12 Pro सीरीज जानेवारीमध्ये लाँच होणार आहे.
Realme 12 Pro सीरीज
आम्ही तुम्हाला सांगतो की, या सिरीजमध्ये Realme 12 Pro आणि Realme 12 Pro+ हे दोन स्मार्टफोन असतील. TDRA, MIIT आणि TENAA या अनेक सर्टिफिकेशन वेबसाइट्सवर स्मार्टफोन दिसले आहेत. त्यानुसार, Pro मॉडेलमध्ये 6.7 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. हा फोन अनेक रॅम व्हेरियंटमध्ये आणला जाण्याची शक्यता आहे. फोन 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज व्हेरिएंटसह येण्याची शक्यता आहे.
याव्यतिरिक्त, सिरीजमधील दुसरा फोन Realme 12 Pro+ मध्ये 32MP मेन कॅमेरा दिला जाऊ शकतो. फोन 4,880mAh बॅटरीने सुसज्ज असू शकतो. फोनची रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट अद्याप समोर आलेले नाहीत. कंपनी लवकरच या सिरीजची लाँच डेट जाहीर करेल, अशी अपेक्षा आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile