Realme 12 Pro+ 5G: Realme 12 Pro सिरीजचा लेटेस्ट Realme 12 Pro+ 5G स्मार्टफोन भारतीय वापरकर्त्यांमध्ये लाँच होताच लोकप्रिय झाला. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने नुकतेच नव्या Realme 13 Pro 5G सिरीजच्या भारतीय लाँचची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर ब्रँड फोनच्या किंमती कमी करून त्याची विक्री सातत्याने वाढवत आहे. लक्षात घ्या की, कंपनीने फोनची संपूर्ण किंमत 3,000 रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. तुम्ही देखील कंपनीचा हा स्टायलिश स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Realme 12 Pro+ 5G ची नवी किंमत जाणून घ्या.
Also Read: Realme C63 फोन भारतीय बाजारात Powerful फीचर्ससह लाँच, किंमत 9,000 रुपयांपेक्षा कमी
वर सांगितल्याप्रमाणे, Realme च्या नवीन ऑफरनुसार Realme 12 Pro Plus 5G स्मार्टफोन आता 3,000 रुपयांच्या कपातीसह खरेदी करता येणार आहे. ही ऑफर फोनच्या तिन्ही स्टोरेज व्हेरियंटवर उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, फोचे बेस मॉडेल 29,999 रुपये, मिड मॉडेल 31,999 रुपये आणि टॉप मॉडेल 33,999 रुपयांना लाँच करण्यात आले होते.
या कपातीनंतर, स्मार्टफोनच्या 8GB RAM + 128GB स्टोरेजची किंमत 26,999 रुपये, 8GB RAM + 256 GB मॉडेलची किंमत 28,999 रुपये आणि 12GB RAM + 256 GB स्टोरेजच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 30,999 रुपये झाली आहे. हा मोबाइल सबमरिनर ब्लू, नेव्हिगेटर बेज आणि एक्सप्लोरर रेड या तीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.
महत्त्वाचे लक्षात घ्या की, ही ऑफर सध्या रिटेल आउटलेटवर 1 जुलै ते 10 जुलै पर्यंत चालणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. या ऑफरचा लाभ भारतातील सर्व ग्राहक घेऊ शकतात.
Realme 12 Pro+ मध्ये 6.7-इंच इंच लांबीचा FHD+ कर्व OLED ProXDR डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Qualcomm Snapdragon 7S Gen 2 चिपसेटसह येतो. फोटोग्राफीसाठी यात बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP चा मुख्य सेन्सर, 64MP पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. विशेष म्हणजे यात 120X झूम आणि OIS तंत्रज्ञान आहे.
आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी हा फोन 32MP फ्रंट कॅमेरासह सज्ज आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, Realme 12 Pro+ मध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 67W फास्ट चार्जिंगसह येईल. फोनमध्ये उपलब्ध इतर फीचर्सबद्द बोलायचे झाल्यास, कनेक्टिव्हिटीसाठी, 5G, 4G LTE, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट फोनमध्ये उपलब्ध आहे. तर, पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी फोनमध्ये IP65 रेटिंग दिली आहे.