Realme 12 Pro 5G सिरीज भारतात लाँच करण्यासाठी सज्ज आहे. ही सिरीज 29 जानेवारी 2024 रोजी लाँच होणार आहे. सीरीज अंतर्गत, Realme 12 Pro, Realme 12 Pro+ 5G आणि Realme 12 Pro Max हे तीन स्मार्टफोन सादर केले जाऊ शकतात. कंपनीने स्मार्टफोनच्या खास फीचर्सची पुष्टी केली आहे. Realme 12 Pro 5G चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. खरं तर, अनेक सर्टिफिकेशन वेबसाइट्सवर स्मार्टफोन दिसले आहेत. त्यामुळे फोनचे जवळपास सर्व स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत.
हे सुद्धा वाचा: OnePlus 12 ची भारतीय किंमत लाँच होण्यापूर्वीच उघड, तुमच्या बजेटमध्ये बसेल का Latest स्मार्टफोन? Tech News
Realme ने त्याच्या अधिकृत X म्हणजेच Twitter अकाउंटवरून एक टीझर Video शेअर केला आहे. यामध्ये Realme 12 Pro सीरीजचा कॅमेरा डिटेल्स दिलेले आहेत. टीझरनुसार सीरिजमध्ये 64MP पेरिस्कोप लेन्स असेल, जो 120x झूमला सपोर्ट करतो. 64MP सेन्सरचा आकार 1/2 इंच असेल. सिरीज OIS समर्थनासह 50MP कॅमेरासह सुसज्ज असेल, अशी कंपनीने पुष्टी केली आहे.
लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, Realme 12 Pro मध्ये 200MP प्रायमरी कॅमेरा असेल. कॅमेरा व्यतिरिक्त, कंपनीने पुष्टी केली आहे की, Realme 12 Pro+ फोन क्रीम कलर ऑप्शनमध्ये येईल.
अलीकडील लीकनुसार, प्लस व्हेरिएंट गीकबेंचवर लिस्ट करण्यात आला आहे. सूचीनुसार, फोन Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर आणि 12GB रॅमसह येईल. या सीरिजचे दोन्ही स्मार्टफोन्सना 6.7 इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले मिळू शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. यात 5000mAh बॅटरी 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येऊ शकतो. मात्र, लक्षात घ्या की, स्मार्टफोनची नेमके स्पेसिफिकेशन्स आणि किंमत लाँच करतानाच कळेल.