लेटेस्ट Realme 12 Pro सिरीजची पहिली Sale सुरु! स्वस्तात खरेदी करण्याची संधी, अप्रतिम ऑफर्स उपलब्ध। Tech News 

लेटेस्ट Realme 12 Pro सिरीजची पहिली Sale सुरु! स्वस्तात खरेदी करण्याची संधी, अप्रतिम ऑफर्स उपलब्ध। Tech News 
HIGHLIGHTS

Realme 12 Pro सीरीजची भारतात पहिली विक्री सुरु

Flipkart वरून Realme 12 Pro खरेदी केल्यास 1,000 रुपयांची बँक सूट

Realme 12 Pro Plus वर 2,000 रुपयांची सूट दिली जात आहे.

Realme ने नुकतेच आपली लेटेस्ट सिरीज Realme 12 Pro सीरीज भारतात लाँच केली आहे. त्यानंतर, या सिरीजची पहिली सेल आज म्हणजेच 6 फेब्रुवारी रोजी सुरु झाली आहे. या लाइनअपमध्ये येणारे Realme 12 Pro आणि Realme 12 Pro+ 5G दुपारी 12 वाजल्यापासून Flipkart वरून खरेदी केले जाऊ शकतात. सिरीजमधील दोन्ही स्मार्टफोन्सवर बंपर सूट उपलब्ध आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात लेटेस्ट स्मार्टफोन्सवरील ऑफर्स-

Realme 12 Pro सिरीजची किंमत

Realme 12 Pro 5G च्या 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 25,999 रुपये इतकी ठेवली गेली आहे. तर, त्याचा 8GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 26,999 रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. त्याबरोबरच, त्याचे टॉप मॉडेल म्हणजे Realme 12 Pro + 5G चे 8GB + 128GB स्टोरेज वेरिएंट 29,999 रुपये, 8GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 31,999 रुपये आणि 12GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 33,999 रुपये इतकी आहे. येथून खरेदी करा

Realme 12 Pro 5G
Realme 12 Pro 5G

Realme 12 Pro सिरीजवरील ऑफर्स

वर सांगितल्याप्रमाणे, Realme 12 Pro सिरीज आज पहिल्यांदा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुल्ले यावर काही विशेष ऑफर्स देखील देण्यात येत आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, Flipkart वरून Realme 12 Pro खरेदी केल्यास 1,000 रुपयांची बँक सूट दिली जात आहे. तर, Realme 12 Pro Plus वर 2,000 रुपयांची सूट दिली जात आहे. सहज खरेदी करण्यासाठी दोन्ही मोबाईल फोनवर नो-कॉस्ट EMI देखील उपलब्ध आहे.

Realme 12 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेक्स

या फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. सुरळीत कामकाजासाठी, मोबाईल फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6 Gen 1 चिपसेट आहे. Realme 12 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP प्राथमिक सेन्सर, दुसरा 32MP टेलिफोटो लेन्स आणि तिसरा 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे, तर सेल्फीसाठी 16MP कॅमेरा उपलब्ध आहे. याशिवाय, हँडसेटमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 67W SUPERVOOC फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह येते.

Realme 12 Pro+ 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Realme 12 Pro Plus 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह FHD+ OLED डिस्प्ले आहे, जो 6.7 इंच लांबीसह येतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी यात Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, Realme 12 Pro Plus मध्ये 50MP मुख्य लेन्स, 64MP टेलिफोटो सेन्सर आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP कॅमेरा उपलब्ध आहे. फोनमध्ये 5000mAh ची मजबूत बॅटरी आहे, जी 67W फास्ट चार्जिंगसह सुसज्ज आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo