बहुप्रतिक्षित Realme 12+ 5G आणि 12 Pro+ 5G Powerful फीचर्ससह ग्लोबली लाँच, तुमच्या बजेटमध्ये आहे का फोन? Tech News 

बहुप्रतिक्षित Realme 12+ 5G आणि 12 Pro+ 5G Powerful फीचर्ससह ग्लोबली लाँच, तुमच्या बजेटमध्ये आहे का फोन? Tech News 
HIGHLIGHTS

Realme 12+ 5G सिरीज जागतिक बाजारात लाँच झाली आहे.

Realme 12+ 5G फोन MediaTek Dimensity 7050 प्रोसेसरने सुसज्ज आहे.

Realme 12 Pro+ 5G फोनमध्ये 50MP Sony IMX890 प्राथमिक कॅमेरा आहे.

मागील काही दिवसांपासून Realme च्या आगामी सिरीजची चर्चा टेक विश्वात सुरु होती. आता अखेर Realme 12+ 5G सिरीज जागतिक बाजारात लाँच झाली आहे. या सिरीजअंतर्गत कंपनीने Realme 12+ 5G आणि Realme 12 Pro+ 5G असे दोन फोन सादर केले आहेत. हा स्मार्टफोन कंपनीने मिड-बजेट रेंजमध्ये सादर केला आहे. नवे स्मार्टफोन्स लवकरच भारतीय बाजारात देखील लाँच केले जातील. फोनमध्ये वॉच-प्रेरित गोल्डन फ्लुटेड बेझल्स आहेत, जे लक्झरी वॉच डिझाइनर Ollivier Savéo यांच्या सहकार्याने बनवले गेले आहेत. त्याबरोबरच, फोनच्या बॅक पॅनलवर व्हेगन लेदर फिनिश देण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊयात नव्या सिरीजची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-

हे सुद्धा वाचा: 64MP कॅमेरासारख्या Powerful फीचर्ससह OPPO F25 Pro 5G लाँच, जाणून घ्या किंमत। Tech News

Realme 12+ 5G
Realme 12+ 5G

Realme 12+ 5G सिरीजची किंमत

Realme 12+ 5G फोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलसाठी सुरुवातीची किंमत $254 म्हणजेच अंदाजे 21,055 रुपये आहे. Realme 12 Pro+ 5G फोनच्या 8GB RAM आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत $356 म्हणजेच अंदाजे 29,511 रुपये आहे. फोन पायोनियर ग्रीन आणि नेव्हिगेटर बेज कलर ऑप्शन्ससह सादर करण्यात आले आहेत.

Realme 12+ 5G सिरीजचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

कंपनीने Realme 12+ 5G फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा E4 AMOLED FHD+ डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. तर, Realme 12 Pro+ 5G फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा AMOLED FHD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 120Hz आहे.

प्रोसेसर आणि स्टोरेज

Realme 12+ 5G फोन MediaTek Dimensity 7050 प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे. तर, Realme 12 Pro+ 5G फोन Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे.

Realme 12 Pro+ 5G
Realme 12 Pro+ 5G

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी, Realme 12+ 5G फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात OIS सपोर्टसह 50MP प्रायमरी कॅमेरा आहे. 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. 2MP मॅक्रो सेन्सर समाविष्ट आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा आहे.

फोटोग्राफीसाठी Realme 12 Pro+ 5G फोनमध्ये 50MP Sony IMX890 प्राथमिक कॅमेरा आहे, जो OIS सपोर्टसह येतो. त्याबरोबरच, 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि तिसरा 64MP टेलिफोटो सेन्सर उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे.

बॅटरी

Realme 12+ 5G फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्यामध्ये 67W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, Realme 12 Pro+ 5G फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्यामध्ये 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo