Realme 12+ 5G India Launch: कंपनीचा Latest स्मार्टफोन ‘या’ दिवशी भारतात होणार दाखल, बक्षिसे जिंकण्याची संधी
Realme 12+ 5G ची भारतीय लाँच तारीख जाहीर करण्यात आली आहे.
Realme 12+ 5G स्मार्टफोन भारतात 6 मार्च 2024 रोजी लाँच होणार
फोनची मायक्रो वेबसाइट देखील Realme India च्या अधिकृत वेबसाइटवर लाइव्ह
मागील काही दिवसांपासून Realme 12+ 5G च्या भारतीय लाँचबद्दल अनेक चर्चा सुरु होत्या. आता अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर कंपनीने या चर्चांना पूर्णविराम देत फोनच्या लाँच तारीख जाहीर केली आहे. कंपनीने आगामी फोनचे लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर पेज देखील लाईव्ह केले आहे. एवढेच नाही तर, फोनची मायक्रो वेबसाइट देखील Realme India च्या अधिकृत वेबसाइटवर लाइव्ह झाली आहे. चला जाणून घेऊयात फोनची लाँच डेट आणि फीचर्स-
हे सुद्धा वाचा: Samsung Galaxy F15 5G ची भारतीय लाँच डेट कन्फर्म! मिळेल 6000mAh जंबो बॅटरी आणि Powerful फीचर्स। Tech News
Realme 12+ 5G India Launch
Realme ने आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर अकाउंटवर ट्विट करून स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर केली आहे. Realme 12+ 5G स्मार्टफोन भारतात 6 मार्च 2024 रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, ‘Realme 12 Series Coming Soon’ असे फ्लिपकार्ट पेजच्या वर लिहिलेले आहे. त्यातच Realme 12+ 5G चे लॉन्च 6 मार्च रोजी असे देखील दाखवले आहे.
अधिकृत साईटवर बक्षीस जिंकण्याची संधी
महत्त्वाचे लक्षात घ्या की, फोनसाठी ‘Notify me’ बटण अधिकृत वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे. यावर क्लिक करून लोक 47 हजार रुपयांपर्यंतचे Realme बक्षीस मिळवू शकतात. Notify me केल्यावर, तुम्हाला ईमेल किंवा मॅसेजद्वारे फोनचे तपशील मिळतील.
Realme 12+ 5G चे कन्फर्म तपशील
वर सांगितल्याप्रमाणे, फ्लिपकार्ट पेजद्वारे फोनच्या खास फीचर्सची पुष्टी केली आहे. पेजवर एक व्हिडिओ दिलेला आहे. त्यात एक फोन दाखवला आहे. त्याबरोबरच, विशेष फीचर्सचा उल्लेख केला गेला आहे. त्यानुसार फोन 120Hz रिफ्रेश रेटसह सुपर AMOLED डिस्प्लेसह सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन OIS सपोर्टसह Sony LYT-600 पोर्ट्रेट कॅमेरासह येईल. त्याबरोबरच, फोनमध्ये Mediatek Dimensity 7050 5G चिपसेट मिळेल.
याव्यतिरिक्त, पेजद्वारे कंपनीने पुष्टी केली आहे की, या सेगमेंटमधील हा पहिला फ्लॅगशिप लक्झरी वॉच डिझाइन केलेला हँडसेट असेल. व्हिडिओमध्ये फोन दोन कलर ऑप्शनमध्ये दिसत आहे. येत्या काळात कंपनी फोनची माहिती शेअर करू शकते, अशी अपेक्षा आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile