Realme 12+ 5G फोनचे भारतीय लाँच Confirm! मिळतील जबरदस्त स्पेसिफिकेशन्स बघा टीजर। Tech News
Realme 12+ 5G आणि 12 Pro+ 5G स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर
29 फेब्रुवारीला Realme 12+ 5G चे मलेशियात लॉंचिंग कन्फर्म
Realme ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर नवीन फोनचा टीझर शेअर केला आहे.
Realme ने नुतकेच Realme 12+ 5G आणि 12 Pro+ 5G स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर केली आहे. काही काळानंतर भारतात नवीन स्मार्टफोन टीज काढण्यात आली आहे. टीझरमध्ये फोनचे नाव नसले तरी ते Realme 12+ 5G असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. 29 फेब्रुवारीला डिव्हाइसची एंट्री होण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या की, याआधी Realme 12 Pro 5G आणि Pro Plus भारतात Realme 12 Pro सीरीज अंतर्गत लाँच केले गेले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात आगामी फोनबद्दल सर्व माहिती-
Realme 12+ 5G चे भारतीय लाँच डिटेल्स
Realme ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर नवीन फोनचा टीझर शेअर केला आहे. त्याच्या X म्हणजेच ट्विटर पोस्टमध्ये ब्रँडने #OneMorePlus हा हॅशटॅग लिहिला आहे. ज्याचा अर्थ असा आहे की नवीन डिव्हाइस Realme 12+ 5G असेल, असे मानले जात आहे. कंपनी आगामी मोबाईल मिड रेंजमध्ये आणणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
एवढेच नाही तर, फोनची मायक्रोसाइट कंपनीच्या वेबसाइटवर लाईव्हही करण्यात आली आहे. ज्यामध्ये त्याची झलक हिरव्या रंगात दिसली आहे. त्याबरोबरच, हे उपकरण लेदर फिनिश आणि व्हर्टिकल स्ट्रॅपमध्ये दिसते. कंपनीचा दावा आहे की, फोनमध्ये 12 नवीन अपग्रेड्स असतील. आम्ही तुम्हाला सांगतो की, 29 फेब्रुवारीला Realme 12+ 5G चे मलेशियात लॉंचिंग कन्फर्म झाले आहे. त्याच दिवशी हा फोन भारतात येण्याची शक्यता आहे.
Realme 12+ 5G चे संभावित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Realme 12+ 5G मध्ये 6.67 इंच लांबीचा फ्लॅट AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. कंपनी फोनच्या परफॉर्मन्ससाठी MediaTek Dimension 7050 चिपसेट वापरू शकतो. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, युजर्सना डिवाइसमध्ये 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज मिळेल. फोनमध्ये 5000mAh दीर्घकाळ चालणारी बॅटरी आणि 67W SuperVOOC फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान दिले जाऊ शकते.
लीकनुसार, स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन सपोर्टसह 50MP प्राइमरी कॅमेरा लेन्स, 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सर दिले जाऊ शकतात. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा असू शकतो.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile