Realme 12 5G सिरीज भारतीय बाजारात लाँच झाली आहे. या लाइनअपमध्ये Realme 12 5G आणि Realme 12+ 5G ही दोन स्मार्टफोन्स सादर करण्यात आली आहेत. याआधी स्मार्टफोन ब्रँड Realme ने भारतीय बाजारात Realme 12 Pro आणि Realme 12 Pro + 5G लाँच केले होते. लेटेस्ट स्मार्टफोन्समध्ये विशेषतः दोन्ही स्मार्टफोन उत्कृष्ट डिस्प्लेसह येतात. त्याबरोबरच, मीडियाटेकचा पॉवरफुल प्रोसेसर दोन्हीमध्ये उपलब्ध आहे. चला तर मग जाणून घेऊयात नव्या सिरीजची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-
हे सुद्धा वाचा: Most Affordable 5G Device: Jio नाही तर Airtel आणणार भारतात सर्वात स्वस्त फोन? वाचा सर्व डिटेल्स। Tech News
Realme 12 5G सीरीजच्या Realme 12 5G ची सुरुवातीची किंमत 16,999 रुपये आहे. तर, Realme 12 Plus 5G ची किंमत 20,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. या स्मार्टफोनची विक्री आज दुपारी 3 वाजता Flipkart सुरू होईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोनवर 2000 रुपयांपर्यंत सूट देखील मिळेल.
Realme 12 5G कंपनीचा पहिला डिवाइस आहे, जो डायनॅमिक बटनसह येतो. हे बटन iPhone 15 Pro Max मध्ये आढळणाऱ्या ॲक्शन बटनप्रमाणे काम करते. या फोनमध्ये HD+ AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. तर, Realme 12 Pro Plus 5G फोनमध्ये 6.67 इंच फुल HD प्लस AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिफ्रेश रेट 120Hz आहे.
पॉवरसाठी Realme 12 5G फोनमध्ये MediaTek 6100+ चिपसेट देण्यात आला आहे. तर, Realme 12 Pro Plus 5G फोनमध्ये MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर दिला गेला आहे.
Realme 12 5G मध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. तर, Realme 12 Pro Plus 5G मध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात आले आहे.
Realme ने Realme 12 5G फोनमध्ये 108MP चा कॅमेरा दिला आहे. यात फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी बॅटरी आहे. तर, फोटो क्लिक करण्यासाठी Realme 12+ 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP मुख्य सेन्सर, 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स आहेत. सेल्फीसाठी 16MP कॅमेरा उपलब्ध आहे.
Realme 12 5G फोनमध्ये यात फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी बॅटरी आहे. तर, Realme ने Realme 12+ 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे. यात 67W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे.