कंपनीने Realme 11x 5G नुकताच भारतात लाँच केला आहे. त्यानंतर, नवीनतम फोनची विक्री आज म्हणजेच 25 ऑगस्ट 2023 पासून सुरू होणार आहे. Realme 11 सीरीज अंतर्गत Realme 11 5G आणि Realme 11x 5G हे दोन स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. आज Realme 11x 5G भारतात विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाईल. तुम्हाला हा 5G स्मार्टफोन लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आणि अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करता येईल.
Realme 11x 5G चा लाइव्ह सेल 25 ऑगस्ट 2023 म्हणेजच आज दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे.फोनची सुरुवातीची किंमत 14,999 रुपये आहे. टॉप व्हेरिएंट 15,999 रुपयांना सादर करण्यात आला आहे. लाँच ऑफर अंतर्गत, ते 1000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी केले जाऊ शकते. फोनवर 1000 डिस्काउंटचे कूपन मिळेल.
लक्षात घ्या की, हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये आणण्यात आला आहे. त्याच्या बेस व्हेरिएंटला 6GB रॅमसह 128GB स्टोरेज मिळते. त्याचा दुसरा व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन मिडनाईट ब्लॅक आणि डॉन पर्पल या दोन कलर ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आला आहे.
Realme 11x 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.72-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे. या डिस्प्लेसह 2400×1080 पिक्सेल रिझोल्युशन देण्यात आले आहे. फोन MediaTek Dimensity 6100+ 5G ऑक्टा कोर प्रोसेसरसह येतो. डायमेंसिटी 6100+ गेमिंगचा आनंद लुटणाऱ्या वापरकर्त्यांसाठी उत्तम आहे. या स्मार्टफोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. Realme 11x 5G फोन Android 13 वर आधारित realme UI 4.0 वर चालतो.
फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील बाजूस 64MP मेन कॅमेरा आणि 2MP पोर्ट्रेट लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोन 33W SUPERVOOC चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी पॅक करतो. फास्ट चार्जिंगद्वारे फोन 29 मिनिटांत 0-50 टक्के चार्ज होतो. ही बॅटरी काही सामान्य कार्ये केल्यास तब्बल दोन दिवस टिकण्याची क्षमता ठेवते.