Realme 11 5G सिरीज अखेर लाँच, जाणून घ्या किंमत आणि खास फीचर्स

Updated on 10-May-2023
HIGHLIGHTS

Realme 11 सिरीज Realme 10 सीरिजचे अपग्रेड वर्जन आहे.

Realme 11 Pro Plus हा या सिरीजमधील सर्वात प्रीमियम फोन

फोनमध्ये 200MP पर्यंत कॅमेरा मिळेल.

Realme ची बहुप्रतीक्षित सिरीज अखेर लाँच झाली आहे. Realme 11 सिरीज Realme 10 सीरिजचे अपग्रेड वर्जन  आहे. या सिरीजमध्ये Realme 11 5G, Realme 11 Pro 5G आणि Realme 11 Pro+ 5G हे स्मार्टफोन समाविष्ट केले आहेत. या सिरीजमधील Realme 11 Pro Plus हा सर्वात प्रीमियम फोन आहे. या फोनमध्ये 200MP कॅमेरा आढळेल. 

Realme 11 5G

 Realme 11 5G फोनमध्ये 6.4-इंच लांबीचा फुल HD+ सॅमोलेड डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. फोन MediaTek Dimensity 6020 प्रोसेसरने सुसज्ज आहे. ज्यामध्ये 8GB RAM आणि 256GB स्टोरेज उपलब्ध आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. फोटोग्राफीसाठी यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64MP चा आहे. त्यासोबत 2MP कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 8MP सेल्फी कॅमेरा मिळेल. 

Realme 11 Pro

Realme 11 Pro मध्ये 6.7-इंच लांबीचा फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. फोन MediaTek Dimensity 7050 प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये जास्तीत जास्त 12GB RAM आणि 256GB स्टोरेज उपलब्ध आहे. हा फोन Android 13 आधारित RealmeUI 4.0 वर काम करतो. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. यामध्ये 100MP चा प्रायमरी कॅमेरा आहे. सेकंडरी कॅमेरा 2MP आणि तिसरा कॅमेरा देखील 2MP चा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 16MP सेल्फी कॅमेरा आहे. 

Realme 11 Pro+

Realme 11 Pro+  मध्ये 6.7-इंच लांबीचा फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. फोन MediaTek Dimensity 7050 प्रोसेसरने सुसज्ज आहे. ज्यामध्ये 12GB RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेज उपलब्ध असेल. हा फोन Android 13 आधारित RealmeUI 4.0 वर काम करतो. फोनला 5000mAh बॅटरी आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. त्याबरोबरच, यात 200MP चा प्राइमरी कॅमेरा आहे, ज्यामध्ये OIS सपोर्ट देण्यात आला आहे. सेकंडरी कॅमेरा 8MP तिसरा कॅमेरा 2MP चा आहे. तसेच, 32MPचा सेल्फी कॅमेरा आहे. 

Realme 11 सिरीजची किंमत

कंपनीने Realme 11 फोनच्या 8GB + 256GB स्टोरेजची किंमत CNY 1599 म्हणजेच सुमारे 18,943 रुपये निश्चित केली आहे. Realme 11 Pro ची किंमत CNY 1699 म्हणेजच अंदाजे 20,123 रुपयांपासून सुरू होईल. तर, याच्या टॉप Realme 11 Pro+ मॉडेलची किंमत CNY 1999 म्हणजेच अंदाजे 23,673 रुपयांपासून सुरु होऊ शकते.

कंपनीने Realme 11 Pro फोन Astral Black, Sunrise Beige आणि Oasis Green मध्ये सादर केला आहे. तर, Realme 11 Pro+ फोन Astral Black, Sunrise Beige आणि Oasis Green मध्ये सादर केला आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :