digit zero1 awards

64MP कॅमेरासह Realme 12 Pro सिरीजचे स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लाँच, बघा सर्व लीक्स। Tech News 

64MP कॅमेरासह Realme 12 Pro सिरीजचे स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लाँच, बघा सर्व लीक्स। Tech News 
HIGHLIGHTS

कंपनी आता Realme 12 Pro सीरीज लाँच करण्याच्या तयारीत आहे.

आगामी Realme 12 Pro सिरीज BIS सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसली.

Realme 12 Pro सिरीज Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसरसह दाखल होण्याची शक्यता

कंपनीने अलीकडेच Realme GT 5 Pro स्मार्टफोन लाँच केला आहे. त्यानंतर, कंपनी आता Realme 12 Pro सीरीज लाँच करण्याच्या तयारीत आहे. ताज्या लीकनुसार, आगामी Realme 12 Pro सिरीज BIS सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसली आहे. या सूचीने फोनच्या भारतीय लाँचबद्दल संकेत दिले आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ फोन जून 2023 मध्ये भारतात लाँच करण्यात आले होते. Realme 11 Pro+ स्मार्टफोन 200MP प्रायमरी कॅमेराने सुसज्ज आहेत.

दरम्यान, कंपनी या सीरीज अंतर्गत Realme 12 Pro आणि Realme 12 Pro+ स्मार्टफोन लाँच करेल, अशी अपेक्षा आहे. Realme 12 Pro आणि Realme 12 Pro+ स्मार्टफोन्स BIS सर्टिफिकेशन साइटवर अनुक्रमे RMX3842 आणि RMX3840 या मॉडेल नंबरसह दिसले आहेत. मॉडेल नंबर व्यतिरिक्त, या सूचीद्वारे या स्मार्टफोन्सशी संबंधित इतर कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Realme 12 Pro and Realme 12 Pro Plus
Realme 12 Pro and Realme 12 Pro Plus

Realme 12 Pro आणि Realme 12 Pro+ लीक तपशील

आगामी स्मार्टफोन्सबद्दल अनेक लीक्स ऑनलाईन पुढे आले आहेत. लीकनुसार, Realme 12 Pro सिरीज Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसरसह दाखल होईल. Realme 12 Pro फोन फोटोग्राफीसाठी 32MP टेलिफोटो सेन्सरसह प्रदान दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये 2X ऑप्टिकल झूमची क्षमता असेल. तर, Realme 12 Pro Plus फोनमध्ये 64MP पेरिस्कोप सेंसर दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये 3X ऑप्टिकल झूम उपलब्ध असू शकतो. फोनचे कन्फर्म तपशील लाँचनंतरच पुढे येतील.

दरम्यान, कंपनीने या सिरीजचे लाँच तपशील देखील उघड केलेले नाहीत आणि त्याबद्दल पुढे आलेली कोणतीही माहिती अधिकृत केली नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही सिरीज चीनमध्ये लाँच केली जाईल आणि नंतर ती भारतात आणली जाऊ शकते, असे सांगितले जात आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo