Realme 11 Pro 5G Vs Realme 10 Pro 5G: नव्या आणि जुन्या फोनमधील अंतर बघा, खरेदीसाठी कोण ठरतंय बेस्ट ?

Updated on 16-Jun-2023
HIGHLIGHTS

Realme 11 Pro 5G स्मार्टफोनची विक्री देखील सुरु झाली आहे.

Realme 10 Pro 5G फोन डिसेंबर 2022 मध्ये लाँच करण्यात आला होता.

जाणून घेऊयात दोन्ही फोनमधील अंतर आणि कोणता ठरेल खरेदीसाठी योग्य

Realme 11 Pro 5G VS Realme 10 Pro 5G: Realme ने अलीकडेच Realme 11 Pro सिरीज देशातीय बाजारात लाँच केली आहे. Realme 11 Pro  5G स्मार्टफोनची विक्री देखील सुरु झाली आहे. नवा फोन खरेदी करण्याआधी तुमच्या मनात बरेच विचार येत असतील. खरं तर, Realme 10 Pro 5G फोन डिसेंबर 2022 मध्ये लाँच करण्यात आला होता. चला तर मग जरा या दोन्ही फोन्सच्या कॅमेरा, डिस्प्ले, परफॉर्मन्स, रॅम आणि किंमत इ. सर्व फीचर्सची छोटीशी तुलना करून बघुयात- 

Realme 11 Pro 5G VS Realme 10 Pro 5G

किमंत

Realme ने हा स्मार्टफोन Realme 11 Pro 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसह 23,999 रुपयांना सादर केला आहे. तर, Realme 10 Pro ची सुरुवातीची किमंत केवळ18, 999 रुपये आहे. 

डिस्प्ले

Realme 11 Pro 5G मध्ये फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा फुल HD+ OLED डिस्प्ले आहे. या डिस्प्लेसह रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 360Hz आहे.

तर, Realme 10 Pro 5G फोन 2400 x 1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.72-इंच लांबीच्या फुल HD + डिस्प्लेसह सादर केला गेला आहे.

स्टोरेज

रॅम आणि स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, Realme 11 Pro फोनमध्ये 8 GB RAM आहे जी गेमर्ससाठी अधिक चांगली आहे. तर, Realme 10 Pro मध्ये 6 GB RAM आहे. परंतु दोन्ही फोनमधील स्टोरेज 128GB आहे. तसेच, दोन्ही फोनमध्ये मेमरी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.

प्रोसेसर

Realme 11 Pro मध्ये MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर आहे. तर Realme 10 Pro मध्ये Snapdragon 695 5G प्रोसेसर आहे.

बॅटरी

दोन्ही फोन्सच्या बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही फोनमध्ये समान 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. मात्र, लक्षात घ्या की, Realme 11 Pro स्मार्टफोन 67W फास्ट चार्जिंग समर्थनासह येतो. तर, Realme 10 Pro स्मार्टफोन 67W superVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. 

कॅमेरा

Realme 11 Pro मध्ये 100 MP मेन कॅमेरासह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर, Realme 10 Pro फोनमध्ये 108 MP प्रायमरी कॅमेरा तुम्हाला फोटोग्राफीसाठी मिळणार आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंग करण्यासाठी दोन्ही फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :