आगामी Realme 11 Pro 5G सिरीजसाठी Early Access सेल, स्वस्तात खरेदीसाठी मिळतील केवळ दोन तास

Updated on 07-Jun-2023
HIGHLIGHTS

Realme 11 Pro 5G सिरीज 8 जून रोजी भारतात लाँच होणार

सिरीजच्या लाँच आधी Early Access सेलची घोषणा

सेल लाँच डेटला संध्याकाळी 6 पासून सुरू होईल आणि रात्री 8 वाजेपर्यंत सुरू असणार आहे.

Realme 11 Pro 5G सिरीज लवकरच लाँच होणार आहे. फोनच्या खरेदीसाठी उत्सुक असणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीने या सिरीजच्या लाँच आधी Early Access सेलची घोषणा केली आहे. अर्ली ऍक्सेस सेल अंतर्गत ग्राहकांना अप्रतिम डील्स आणि ऑफर्स मिळणार आहेत. बघा डिटेल्स – 

Realme 11 Pro 5G सिरीजसाठी अर्ली ऍक्सेस सेल

 

https://twitter.com/realmeIndia/status/1665968298117459969?ref_src=twsrc%5Etfw

 

Realme India ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे Realme 11 Pro 5G सिरीजसाठी अर्ली ऍक्सेस सेलची घोषणा केली आहे. हा सेल लाँच डेट म्हणजे 8 जून रोजी संध्याकाळी 6 पासून सुरू होईल आणि रात्री 8 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. याशिवाय 9 जूनच्या मध्यरात्री 12 वाजतापासून फोनचे प्री-बुकिंग सुरू केले जाईल. 

वर सांगितल्याप्रमाणे, अर्ली ऍक्सेस सेल अंतर्गत कंपनीने अनेक उत्तम डील्स आणि सवलतीच्या ऑफर सादर केले जाणार आहेत. सेलमध्ये HDFC आणि SBI बँकेद्वारे फोन खरेदी केल्यास तुम्हाला 1,500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे. तसेच, कंपनी यासह एक्सचेंज ऑफर अंतर्गत 1,500 रुपयांची सूट देखील देणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. 

आम्ही तुम्हाला सांगतो की, Realme 11 5G Pro आणि Realme 11 Pro+ 5G स्मार्टफोन भारतात या सीरीज अंतर्गत लाँच होण्याची शक्यता आहे. Realme 11 Pro Plus 5G हा या सिरीजमधील सर्वात प्रीमियम फोन आहे, जो 200MP कॅमेरासह येतो. तुम्ही 200MP कॅमेरा असलेला Realme फोन खरेदी करण्यास देखील इच्छुक असाल, तर अर्ली ऍक्सेस सेल अजिबात चुकवू नका.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :