Realme 11 Pro 5G Sale: नुकतेच लाँच झालेल्या स्मार्टफोनची विक्री सुरु, मिळतोय जबरदस्त डिस्काउंट

Updated on 16-Jun-2023
HIGHLIGHTS

Realme 11 Pro सिरीज अलीकडेच भारतात लाँच झाली आहे.

आजपासून Realme 11 Pro 5G ची सेल सुरू झाली आहे.

मागील बाजूस 100MP मेन कॅमेरा उपलब्ध आहे.

 Realme 11 Pro 5G Sale: Realme 11 Pro सिरीज अलीकडेच भारतात लाँच झाली आहे, या सिरीजमध्ये दोन मॉडेल्स सादर करण्यात आले आहेत. या सिरीजअंतर्गत काल म्हणजेच 15 जूनला Realme 11 Pro+ 5G ची सेल सुरु करण्यात आली आहे. तर, आजपासून Realme 11 Pro 5G ची सेल सुरू झाली आहे. पहिल्या सेलमध्ये स्मार्टफोनवर भारी सूट मिळणार आहे.

Realme 11 Pro 5G वरील पहिल्या सेलमधील ऑफर्स

वर सांगितल्याप्रमाणे  Realme 11 Pro 5G ची सेल सुरु झाली आहे. स्मार्टफोन Flipkart आणि Realme.com म्हणजे कंपनीच्या अधिकृत साईटवरून स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध आहे. Realme ने हा स्मार्टफोन 23,999 रुपयांना सादर केला आहे.  कंपनीने हा फोन Astral Black, Sunrise Beige आणि Oasis Green मध्ये सादर केला आहे.

 पहिल्या सेलमध्ये या फोनवर उत्तम ऑफर्स मिळणार आहेत. SBI आणि HDFC बँक कार्डवर 1500 रुपयांची झटपट सूट उपलब्ध आहे. तसेच, एक्सचेंज ऑफरवर 1500 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा 

Realme 11 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स

Realme 11 Pro 5G फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा फुल HD+ OLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 360Hz आहे. फोनमध्ये Mediatek Dimensity 7050 प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्यासोबत 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज मिळणार आहे. 

याशिवाय, उत्तम फोटोग्राफी करण्यासाठी तुम्हाला फोनमध्ये हँडसेटच्या मागील बाजूस 100MP मेन कॅमेरा आणि 2MP चा सेकंडरी सेन्सर उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंटला 16MP कॅमेरा मिळेल. तसेच, फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :