Realme 11 5G and Realme 11X 5G Launch: जबरदस्त स्मार्टफोनची लाँच डेट कन्फर्म, बघा सर्व डिटेल्स

Realme 11 5G and Realme 11X 5G Launch: जबरदस्त स्मार्टफोनची लाँच डेट कन्फर्म, बघा सर्व डिटेल्स
HIGHLIGHTS

कंपनीने अधिकृतपणे या महिन्यात Realme 11 5G आणि Realme 11X 5G च्या भारतीय लाँचची घोषणा केली आहे.

लॉन्च इव्हेंट 23 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता निश्चित केला आहे.

Realme 11 आणि Realme 11X साठी प्री-ऑर्डर 23 ऑगस्टपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे, जी 28 ऑगस्टपर्यंत चालू शकते.

Realme आपला आगामी स्मार्टफोन भारतात आणण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने अधिकृतपणे या महिन्यात Realme 11 5G आणि Realme 11X 5G च्या भारतीय लाँचची घोषणा केली आहे. Realme 11 5G पहिल्यांदा चीनमध्ये सादर करण्यात आला. हे दोन्ही मॉडेल समान फीचर्ससह येण्याची अपेक्षा आहे. त्याबरोबरच, हे स्मार्टफोन किफायतशीर असू शकतात. 

Realme चे लेटेस्ट स्मार्टफोन अलीकडेच म्हणजे Realme 11 Pro 5G आणि Realme 11 Pro+ 5G भारतात जूनमध्ये सादर करण्यात आले होते. आता कंपनीने आगामी हँडसेटची डिझाइन आणि इतर तपशील सादर केले आहेत. फोनचे डिझाइन, कलर ऑप्शन्स, सेल डिटेल्स आणि स्पेसिफिकेशन्स लाँचपूर्वीच एका लीकद्वारे समोर आले आहेत.

Realme 11 5G and Realme 11X 5G लाँच डेट आणि प्री-ऑर्डर

Realme ने पुष्टी केली आहे की, Realme 11 5G आणि Realme 11X 5G चे लॉन्च इव्हेंट 23 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता निश्चित केला आहे. अहवालानुसार, Realme 11 आणि Realme 11X साठी प्री-ऑर्डर 23 ऑगस्टपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे, जी 28 ऑगस्टपर्यंत चालू शकते. बेस व्हेरिएंटची प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना Realme Buds Wireless 2 Neo मोफत मिळण्याची शक्यता आहे, ज्याची किंमत 1,299 रुपये आहे. दरम्यान, Realme 11X ची प्री-ऑर्डर करणाऱ्यांना 599 रुपये किमतीचा Realme Buds 2 चा मोफत सेट मिळण्याची अपेक्षा आहे.

डिझाईन 

 कंपनीने दोन्ही मॉडेल्सच्या फ्रंट कॅमेर्‍यासाठी डिस्प्लेच्या टॉपवर सेंटर अलाइन पंच-होल कटआउट दिसू शकतो. मागील पॅनल चमकणाऱ्या फिनिश डिझाइनसह येईल. याशिवाय, फोनच्या मागील बाजूस वरच्या डाव्या कोपर्यात आकारमान गोलाकार कॅमेरा मॉड्यूल आढळू शकतो, ज्यामध्ये LED फ्लॅश युनिट देखील समाविष्ट असेल. या फोन तीन रंग पर्यायांमध्ये सादर होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, 6.72-इंच लांबीचा फुल HD+ (2400 x 1080 पिक्सेल) IPS LCD डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट असू शकतो.

प्रोसेसर

रिपोर्ट्सनुसार, Realme 11 5G ला 'ग्लोरी हॅलो' डिझाइनसह पाहिले जाऊ शकते, तर Realme 11X S-कर्व डिझाइनसह येण्याची अपेक्षा आहे. दोन्ही स्मार्टफोन्स ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 6100+ चिपसेटद्वारे समर्थित असण्याची शक्यता आहे. 

स्टोरेज

 Realme 11 5G स्मार्टफोन 8GB + 128GB आणि 8GB + 256GB व्हेरियंटमध्ये लॉन्च होऊ शकतो. त्याबरोबरच, ग्लोरी ब्लॅक आणि ग्लोरी गोल्ड शेडमध्ये ऑफर केला जाऊ शकतो, असेही रिपोर्ट्समध्ये समोर आले आहे. दुसरीकडे, Realme 11X 6GB + 128GB आणि 8GB + 256GB कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. हा हँडसेट मिडनाईट ब्लॅक आणि पर्पल डाउन कलर पर्यायांमध्ये येऊ शकतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo