Realme ने अलीकडेच भारतात Realme 10 Pro सिरीज लाँच केली आहे. त्यानंतर, आता Realme चा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी Redmi ने देखील त्याच बजेटमध्ये Redmi Note 12 सीरीज भारतात लाँच केली आहे. जिथे Realme 10 Pro सिरीज दोन स्मार्टफोन आले आहेत, तिथे Redmi ने तीन फोन लाँच केले आहेत. परंतु दोन्ही सिरीजमधील हाय-एंड व्हेरिएंट, Realme 10 Pro+ आणि Redmi Note 12 Pro+ यांच्यात जबरदस्त स्पर्धा आहे. जाणून घेऊयात दोन्ही फोनच्या तुलनेत कोणता फोन ठरेल तुमच्यासाठी बेस्ट…
हे सुद्धा वाचा : Amazon Prime Phones Party Sale : Xiaomi ते Samsung पर्यंत सर्व फोनवर बंपर ऑफर सुरु…
Realme 10 Pro+ : 6+128GB – रु. 24,999, 8+128GB – रु 25,999, 8+256GB – रु. 27,999.
Redmi Note 12 Pro+ : 8+256GB – रु. 26,999 आणि 12+256GB – रु 29,999.
Realme 10 Pro+ Flipkart वर उपलब्ध आहे. तर, Flipkart आणि mi.com वर Redmi Note 12 Pro+ खरेदी करू शकता. या दोन्ही स्मार्टफोन्सवर विविध बँक ऑफर्ससह 3,000 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे.
Realme 10 Pro+ 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, HDR10+ आणि 800 nits ब्राइटनेससह 6.7-इंच फुल HD+ AMOLED डिस्प्ले असेल.
Redmi Note 12 Pro+ 5G मधील साईज जवळपास 6.67-इंच लांबीसारखाच आहे. यात 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्ट देखील आहे. पण त्याबरोबरच, यात प्रो-एमोलेड पॅनलचा वापर करण्यात आला आहे. स्क्रीनमध्ये 240Hz टच सॅम्पलिंग रेट, 1 बिलियन कलर्ससाठी सपोर्ट, डॉल्बी व्हिजन आणि 900 निट्स पर्यंत ब्राइटनेस आणि तुम्हाला यावर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 संरक्षण देखील मिळते.
Realme 10 Pro+ 5G 3 स्टोरेज मॉडेल्समध्ये येईल. ज्यामध्ये 128GB स्टोरेजसह 8GB रॅम, 256GB स्टोरेजसह 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह 12GB रॅम आहे.
तर, Redmi Note 12 Pro+ ड्युअल स्टोरेज प्रकारांमध्ये लाँच करण्यात आला आहे – 256GB स्टोरेजसह 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह 12GB रॅम.
हे दोन्ही स्मार्टफोन ऑक्टा कोअर मीडियाटेक डायमेंसिटी 1080 चिपसेटवर काम करतात आणि दोन्हीमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज आहे.
Realme 10 Pro+ मध्ये Android 13 च्या वर Realme UI 4.0 स्किन आहे आणि Android 12 च्या वर Redmi Note 12 Pro+ 5G मध्ये MIUI 13 स्किन आहे.
कंपनीने Redmi Note 12 Pro+ चा कॅमेरा खूप चांगला असल्याचे सांगितले आहे. या हँडसेटमध्ये 200MP मुख्य कॅमेरा आहे, जो HPX सेन्सरसह येतो. तर Realme 10 Pro+ चा मुख्य कॅमेरा 108MP चा आहे.
याशिवाय, तुम्हाला दोन्हीमध्ये सेकंडरी 8MP अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स देखील मिळतील.
Realme 10 Pro+ मध्ये 5000mAh बॅटरी आहे, परंतु यामध्ये तुम्हाला 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. Redmi Note 12 Pro+ मधील बॅटरी 4980mAh आहे, परंतु त्याच वेळी 120W फास्ट चार्जिंग येथे उपलब्ध आहे.
Realme 10 Pro+ आणि Redmi Note 12 Pro+ या दोन्हींमध्ये 5G, 4G, WiFi 802.11, Bluetooth 5.2, GPS, GALILEO, GLONASS, Type-C पोर्ट, साइड फिंगरप्रिंट सेन्सर इत्यादी वैशिष्ट्ये आहेत.