digit zero1 awards

Realme 10 Pro 5G चे Coca-Cola एडिशन लवकरच भारतात दाखल होणार, लाँच डेट जाहीर

Realme 10 Pro 5G चे Coca-Cola एडिशन लवकरच भारतात दाखल होणार, लाँच डेट जाहीर
HIGHLIGHTS

Realme 10 Pro 5G Coca-Cola स्पेशल एडिशन

स्पेशल एडिशन फोन भारतात 10 फेब्रुवारीला लाँच होणार

फोनमधील डिझाईन वगळता सर्व काही Realme 10 Pro 5G सारखे असेल

Realme ने पुढील आठवड्यात आपला नवीन Coca-Cola स्पेशल एडिशन फोन Realme 10 Pro 5G लॉन्च करण्याची पुष्टी केली आहे. स्मार्टफोन निर्मात्याने एक व्हिडिओ टीझर जारी केला आहे, ज्यात आगामी फोन लाँच करण्याची घोषणा केली आहे, तसेच त्याचे डिझाइन देखील आहे. कंपनी हा स्पेशल एडिशन फोन भारतात 10 फेब्रुवारीला लाँच करणार आहे. Realme 10 Pro 5G  फोन भारतात डिसेंबर 2022 मध्ये लाँच झाला होता. 

हे सुद्धा वाचा : Nothing Phone 1 vs OnePlus 10R : कोणता फोन आहे तुमच्यासाठी बेस्ट ?

ट्विटरवर दिली माहिती 

 

 

कंपनीने टीझर व्हिडिओद्वारे Realme Coca-Cola स्पेशल एडिशन फोनची भारतातील लाँच डेट आणि डिझाइनची पुष्टी केली आहे. ट्विटर हँडलवर टीझर शेअर करताना कंपनीने लिहिले की, Realme चे Coca-Cola एडिशन भारतात 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:30 वाजता लाँच केले जाईल. ही मूलत: Realme 10 Pro 5G ची विशेष आवृत्ती आहे. कोका-कोला आणि रियलमी ब्रँडिंगसह लाल आणि काळ्या रंगात ड्युअल-कलर टोनचा मागील पॅनेल उघड करून कंपनीने फोनची डिझाईन टीज केली.

Realme 10 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

Realme 10 Pro 5G डिसेंबर 2022 मध्ये Realme 10 Pro+ 5G सोबत लाँच झाला आहे. फोन 120Hz रिफ्रेश रेट आणि 680 nits च्या पीक ब्राइटनेससह 6.72-इंच लांबीच्या IPS LCD स्क्रीनसह लाँच करण्यात आला आहे. ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरसह फोनमध्ये 8 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज आहे.

Realme 10 Pro 5G मध्ये 108-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. हे Android 13 वर आधारित Realme UI 4.0 वर चालते. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आणि 33W फास्ट वायर्ड चार्जिंगसाठी सपोर्ट आहे.

या देशांमध्येही कोका-कोला स्पेशल एडिशन लाँच होणार 

टिपस्टर पारस गुगलानी यांनी दावा केला आहे, की आगामी Realme 10 Pro 5G Coca-Cola स्पेशल एडिशन देखील खास भारत, इंडोनेशिया, फिलीपिन्स, थायलंड आणि मलेशियामध्ये लाँच केला जाईल. फोनमधील डिझाईन वगळता सर्व काही Realme 10 Pro 5G सारखे असेल, असा दावा त्यांनी केला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo