Realme 10 4G : जबरदस्त फोन नव्या कलर व्हेरिएंटमध्ये होणार लाँच, बघा Photos…

Updated on 07-Nov-2022
HIGHLIGHTS

Realme 10 4G आणखी एका नव्या कलर व्हेरिएंटमध्ये लाँच होणार

रियलमीने शुक्रवारी ट्विट करून क्लॅश ब्लॅक कलरमध्ये Realme 10 4G सादर केले.

Realme 10 4G 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता लाँच होईल.

प्रीमियम डिझाइनसह Realme 10 4G फोन लवकरच लाँच होणार आहे. अलीकडेच, Realme 10 4G क्लॅश व्हाईट कलरमध्ये येण्यासाठी टीज केले गेले. कंपनीने आता आपला नवीन कलर ऑप्शन उघड केला आहे, जो लूकमध्ये खूप प्रीमियम आहे. Realme ने सांगितले आहे की, हा स्मार्टफोन रश ब्लॅक कलरमध्ये देखील येईल. यासोबतच, कंपनीने एक टीझर इमेज देखील पोस्ट केली आहे, ज्यामध्ये नवीन कलर ऑप्शनसह फोनच्या मागील पॅनलची झलक दिसत आहे.

हे सुद्धा वाचा : Reliance Jio पेक्षा स्वस्त प्लॅन, 1Gbps स्पीड, अमर्यादित डेटा आणि मोफत OTT चाही आनंद घ्या…

हा हँडसेट 9 नोव्हेंबर रोजी लाँच होईल. त्याबरोबरच, MediaTek Dimensity G99 चिपसेट आणि सुपर AMOLED डिस्प्लेसह येईल.

कंपनीने ट्विट करून नवा कलर टीज केला

रियलमीने शुक्रवारी ट्विट करून क्लॅश ब्लॅक कलरमध्ये Realme 10 4G सादर केले. फोटोमधून हा स्मार्टफोन उजव्या बाजूला पॉवर बटण आणि व्हॉल्यूम रॉकरसह येईल, हे  समजून येते. हे LED फ्लॅशसह ड्युअल-रियर कॅमेरा सेटअप देखील येईल.

 कंपनीने पुष्टी केली आहे की, Realme 10 4G 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता लाँच होईल. लॉन्च होण्यापूर्वी स्मार्टफोन Realme Indonesia साइटवर देखील सूचीबद्ध केला गेला आहे. या लिस्टद्वारे या आगामी हँडसेटची संपूर्ण फीचर्स पुढे आली आहेत.

 

https://twitter.com/realmeglobal/status/1588471113037873152?ref_src=twsrc%5Etfw

 

Realme 10 4G चे स्पेसिफिकेशन्स

Realme 10 4G मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह फुल-HD + सुपर AMOLED डिस्प्ले आहे. सेल्फी कॅमेरा ठेवण्यासाठी डिस्प्लेला वरच्या डाव्या कोपऱ्यात पंच-होल स्लॉट मिळतो. आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे, हा Realme स्मार्टफोन MediaTek Dimensity G99 चिपसेटने सुसज्ज आहे. याला 8GB ऑनबोर्ड रॅम आणि 8GB पर्यंत डायनॅमिक रॅम मिळतो. म्हणजेच फोनमध्ये एकूण 16GB रॅम उपलब्ध मिळेल.

50-मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि 16-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. Realme 10 4G Android 12 वर Realme UI 3.0 स्किन वर चालतो. स्मार्टफोन 33W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरीसह येतो. कंपनीचा दावा आहे की, त्याची बॅटरी 21 तासांपर्यंत व्हिडिओ स्ट्रीमिंग करू शकते.

 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :