स्मार्टफोन ब्रँड Realme ने आपला नवीन फोन Realme 10 4G लाँच केला आहे. हा फोन जागतिक स्तरावर सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये MediaTek Helio G99 प्रोसेसर आणि 90Hz रिफ्रेश रेट AMOLED डिस्प्ले सपोर्ट करण्यात आला आहे. Realme 10 4G मध्ये 50-मेगापिक्सेल कॅमेरा सेटअप आणि 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा : आता स्वस्त होईल मनोरंजन ! Netflix चा सर्वात स्वस्त आणि मस्त प्लॅन, काय असेल खास…
Realme 10 4G मध्ये 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.4-इंच फुल HD + सुपर AMOLED डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेट, 360Hz टच सॅम्पलिंग रेट आहे. डिस्प्लेसह NTSC कलर गॅमट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन उपलब्ध आहे. Octacore MediaTek Helio G99 प्रोसेसर Realme 10 4G सह समर्थित आहे. फोन 8 GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेजला सपोर्ट करतो.
Realme 10 4G मध्ये 5000 mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये 3.5 मिमी हेडफोन जॅक, USB टाइप-C पोर्ट, मायक्रो SD कार्ड स्लॉट, Wi-Fi, ब्लूटूथ 5.1 आणि NFC साठी समर्थन आहे. प्रोटेक्शनसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरचाही सपोर्ट आहे.
Realme 10 4G सह ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, ज्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा येतो. तर सेकंडरी कॅमेरा 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरसह येतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. HDR, नाईट मोड आणि अल्ट्रा स्टेडी व्हिडिओ सारखी फीचर्स कॅमेरासोबत उपलब्ध आहेत.
Realme 10 4G पाच स्टोरेज पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनच्या 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत $229 म्हणजेच सुमारे 18,600 रुपये आहे. 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत $249 म्हणजेच सुमारे 20,400 रुपये आहे. 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत $269 म्हणजेच सुमारे 21,800 रुपये आहे. तर, 8GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत $279 म्हणजेच सुमारे 22,600 रुपये आहे. आणि, 8G RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत $299 म्हणजेच सुमारे 24,300 रुपये आहे. हा फोन क्लॅश व्हाईट आणि रश ब्लॅक कलरमध्ये सादर करण्यात आला आहे.