Realmeचा नवीन फोन भारतात लाँच, परंतु ‘या’ फिचरच्या अभावामुळे होईल निराशा

Realmeचा नवीन फोन भारतात लाँच, परंतु ‘या’ फिचरच्या अभावामुळे होईल निराशा
HIGHLIGHTS

Realme 10 4G MediaTek Helio G99 SoC द्वारे समर्थित आहे.

Realme 10 4G मध्ये 50 मेगापिक्सेल कॅमेरा मिळत आहे.

फोन 4G नेटवर्कसह येतो आणि सध्या 5G ला डिमांड आहे.

Realme 10 4G भारतात लाँच झाला आहे. हँडसेट मागील वर्षी आलेल्या Realme 9 ची जागा घेईल. स्क्रीनच्या डाव्या बाजूला पंच-होल कटआउट देण्यात आला आहे, तर सिक्योरिटीसाठी फोनला साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर मिळत आहे. याशिवाय फोनमध्ये 50MP डुअल रियर कॅमेरा मिळत आहे. फोनमध्ये हाय-रेस ऑडिओ, 3.5 मिमी ऑडिओ जॅक, युनिक ग्रेडियंट डिझाइन उपलब्ध आहेत.

हे सुद्धा वाचा : भारीच की ! Airtelने लाँच केला RewardsMini बेनिफिट, मिळेल भरपूर कॅशबॅक

Realme 10 4G मध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.5-इंच लांबीचा FHD + AMOLED डिस्प्ले मिळत आहे. फोन MediaTek Helio G99 SoC द्वारे समर्थित आहे आणि Android 13 OS सह शिप करतो. याशिवाय फोनमध्ये 16MP सेल्फी कॅमेरा मिळत आहे. मात्र, तुम्हाला निराश करणारी एक गोष्ट आहे, ती म्हणजे फोन 4G नेटवर्कसह येतो आणि सध्या 5G ला डिमांड आहे.

REALME 10 4G चे स्पेसिफिकेशन्स 

Realme 10 मध्ये पंच-होल कटआउटसह 6.5-इंच FHD+ AMOLED डिस्प्ले आहे, आणि 90Hz रीफ्रेश रेट ऑफर करतो. फोन MediaTek Helio G99 SoC द्वारे समर्थित आहे आणि 8GB LPDDR4X RAM आणि 128GB UFS 2.2 स्टोरेजसह जोडलेला आहे. Android 13 वर आधारित Realme UI कस्टम स्किनवर हँडसेट काम करतो.

फोनमध्ये 5,000mAh पॉवरची बॅटरी आहे, जी 33W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ, USB टाइप-C पोर्ट आणि GPS सपोर्ट आहे. Realme 10 मध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP B&W पोर्ट्रेट कॅमेरा येतो. स्मार्टफोनच्या पुढील बाजूस 16MP सेल्फी आणि व्हिडिओ कॅमेरा देण्यात आला आहे.

REALME 10 4G ची किंमत आणि उपलब्धता 

Realme 10 4G ची किंमत 4GB + 64GB व्हेरिएंटसाठी रुपये 13,999 आणि 8GB + 128GB व्हेरिएंटसाठी रुपये 16,999 आहे. लाँच ऑफर अंतर्गत, Realme 10 4G 4GB + 64GB 1,000 रुपयांच्या सवलतीसह विकले जाईल, त्यानंतर त्याची किंमत 12,999 रुपयांपासून सुरू होईल. Realme 10 4G क्लॅश व्हाईट आणि रश ब्लॅक या दोन कलर ऑप्शनमध्ये येतो. स्मार्टफोनची पहिली विक्री 15 जानेवारीपासून realme.com, Flipkart आणि रिटेल स्टोअर्सवर सुरू होईल. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo