५५०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत लाँच झाला हा 4G स्मार्टफोन

५५००  रुपयांपेक्षाही कमी किंमतीत लाँच झाला हा 4G स्मार्टफोन
HIGHLIGHTS

1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसर, 1GB रॅम आणि 540x960 पिक्सेल रिझोल्युशन असलेल्या ह्या स्मार्टफोनला ५.५ इंचाची QHD IPS स्क्रीन देण्यात आली आहे. ज्याची किंमत ५,४४४ रुपये आहे.

भारतात रिच मोबाइलने 4G सह बजेट अॅनड्रॉईड स्मार्टफोन एल्युर लाँच केला आहे. ज्याची किंमत केवळ ५,४४४ रुपये ठेवण्यात आली आहे. हा केवळ ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट शॉपक्लूजवर मिळत आहे. ह्या फोनमध्ये ५.५ इंचाची QHD IPS डिस्प्ले देण्यात आली आहे, ज्याचे रिझोल्युशन 540×960 पिक्सेल आहे. हा ड्यूल सिमला सपोर्ट करतो. ह्यात 1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसर, 1GB रॅम, 8GB अंतर्गत मेमरी ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो. हा फोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालेल.

 

हेदेखील पाहा – गोष्ट भले वैशिष्ट्यांची असो वा कामगिरीची, पण हे ७ स्मार्टफोन्स त्या सर्वात आहेत अव्वल!

 

ह्या स्मार्टफोनच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 10 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. त्याचबरोबर हा टच फोकस, पॅनोरमा, इमेज एडिट, फेस ब्युटीसह आणि इतर अनेक खास वैशिष्ट्यांसह येतो. ह्याच्या बॅटरीविषयी बोलायचे झाले तर, हा तुम्हाला २०० तासांचा स्टँडबाय टाइम देतो. ह्या नवीन डिवाइसमध्ये प्रॉक्सिमिटी सेंसर आणि जी-सेंसर आहेत.
 

हेदेखील वाचा – “Make for India” च्या अंतर्गत सॅमसंग केवळ १ रुपयात देत आहे हे स्मार्टफोन्स
हेदेखील वाचा – LG ने लाँच केला असा फिंगरप्रिंट सेंसर जो येईल स्मार्टफोन डिस्प्लेच्या आत

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo