Razer दुसर्‍या जेनेरेशनच्या Razer Phone वर करत आहे काम

Updated on 05-Sep-2018
HIGHLIGHTS

Razer Phone च्या दुसर्‍या पिढीच्या फोन बद्दल माहिती समोर आली आहे पण हा डिवाइस कधी लॉन्च केला जाईल याची तसेच याचे इतर डिटेल्स समोर आले नाहीत.

एका रिपोर्ट नुसार Razer आपल्या दुसर्‍या पिढीतील Razer Phone वर काम करत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी आलेल्या कंपनीच्या अर्निंग रिपोर्ट मधून असे समोर आले आहे, ही बातमी 9to5Google कडून आली आहे. 

पण Razer आपल्या दुसर्‍या पिढीच्या Razer Phone वर काम करत आहे, याव्यतिरिक्त दुसरी कोणतीही माहिती समोर आली नाही. तसेच कंपनी ने आता पर्यंत आपल्या जुन्या Razer Phone किंवा असे म्हणूया कि ओरिजिनल Razer Phone चे किती यूनिट सेल केले याची माहिती पण मिळाली नाही. पण एवढे मात्र नक्की की कंपनी ने या डिवाइसची चांगलीच विक्री केली आहे. 

दुसर्‍या पिढीतील दुसर्‍या Razer Phone बद्दल अशी माहिती समोर आली आहे की हा पण आता पर्यंतच्या सर्वात ताकदवान प्रोसेसर सह लॉन्च केला जाऊ शकतो. Razer Phone बद्दल बोलायचे तर हा हाई-एंड स्पेसिफिकेशन्स सह काही चांगल्या फीचर्स सोबत लॉन्च करण्यात आला होता, यात तुम्हाला डेस्कटॉप गेमिंग टेक्नोलॉजी पण मिळत होती. हा डिवाइस कंपनी ने 5.72-इंचाच्या शार्प IGZO स्क्रीन सह लॉन्च केला होता, ज्याचे स्क्रीन रेजोल्यूशन 2560×1440 पिक्सल होते. 

हा डिवाइस क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835 सह लॉन्च करण्यात आला होता. या डिवाइस मध्ये तुम्हाला 8GB रॅम मेमरी मिळत आहे, तसेच यात 64GB ची इंटरनल स्टोरेज पण तुम्हाला मिळेल. जी तुम्ही माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 2TB पर्यंत वाढवू शकता. फोटोग्राफी साठी फोन मध्ये तुम्हाला एक ड्यूल कॅमेरा सेटअप मिळत आहे. ज्यात 12-मेगापिक्सल + 13-मेगापिक्सल असे कॅमेरे आहेत, त्याचबरोबर यात तुम्हाला एक 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पण मिळत आहे. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :