Raksha Bandhan Sale: या रक्षाबंधनाला तुमच्या बहिणीला नवीन स्मार्टफोन भेट द्या, Amazon वर Best ऑफरसह उपलब्ध

Updated on 31-Jul-2024
HIGHLIGHTS

रक्षाबंधननिमित्त Amazon वर देखील रक्षाबंधन स्टोअर सेल लाईव्ह

रक्षाबंधन सेलदरम्यान, ई-कॉमर्स दिग्गज स्मार्टफोन्सवर 40% पर्यंत सूट देत आहे.

स्मार्टफोनवर बँक कार्डद्वारे तब्बल 7000 रुपयांची सूट दिली जात आहे.

भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेमाचा सण म्हणजेच रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या सणानिमित्त भावंड एकमेकांना गिफ्ट्स देत असतात. त्यामुळे आता Amazon वर देखील रक्षाबंधन स्टोअर सेल लाईव्ह करण्यात आली आहे. या सेलदरम्यान, ई-कॉमर्स दिग्गज स्मार्टफोन्सवर 40% पर्यंत सूट देत आहे. या रक्षाबंधनाला तुम्ही तुमच्या बहिणीसाठी किंवा भावासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा सेलदरम्यान तुमच्यासाठी अनेक भारी डील्स उपलब्ध आहेत.

Also Read: ब्रँडने शेअर केला Nothing Phone (2a) Plus चे आकर्षक डिझाईन, मिळेल 50MP सेल्फी कॅमेरा

Samsung Galaxy M34 5G

Samsung Galaxy M34 5G फोनचा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून फक्त 14,880 रुपयांना खरेदी करता येईल. या फोनमध्ये 6.5 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Exynos 1280 प्रोसेसरने सुसज्ज आहे. त्याबरोबरच, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP कॅमेरा, 8MP चा सेकंडरी कॅमेरा आणि 2MP चा तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 13MP कॅमेरा आहे. फोनमध्ये 6000mAh बॅटरी देखील आहे. येथून खरेदी करा

OnePlus 12

OnePlus 12 स्मार्टफोनचा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 64,999 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर बँक कार्डद्वारे तब्बल 7000 रुपयांची सूट दिली जात आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये 2K डिस्प्ले आहे. याशिवाय, फोन स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज आहे.

फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP Sony LYT-808 प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यात 64MP टेलिफोटो सेन्सर आणि 48MP अल्ट्रा-वाइड सेन्सरचा समावेश आहे. फोनमध्ये 5400mAh बॅटरी आहे, जी 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

IQOO Z9 Lite 5G

IQOO Z9 Lite 5G स्मार्टफोनचा 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 10,498 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर बँक ऑफर्स, नो कॉस्ट EMI इ. उपलब्ध आहेत. फीचर्सबद्दल बोललो तर, हा फोन कमी किमतीत जबरदस्त फीचर्स ऑफर करतो. उत्तम परफॉर्मन्ससाठी, हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 6300 5G प्रोसेसरसह सुसज्ज आहे.

कॅमेरा सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, 50MP Sony AI कॅमेऱ्याने तीक्ष्ण आणि व्हायब्रण्ट इमेज कॅप्चर करता येतील. प्रत्येक ज्वलंत आणि तेजस्वी क्षण तुमच्या कॅमेऱ्यात AI फोटो एन्हांसर, नाईट मोड इ. फीचर्ससह उत्तम प्रकारे फ्रेम केला आहे. पॉवरसाठी फोनमध्ये 5000mAh बॅटरी उपलब्ध आहे. Buy From Here

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :