क्वालकॉम ने केली स्नॅपड्रॅगन 710 मोबाईल प्लॅटफार्म ची घोषणा, मिळत आहेत हे नवीन फीचर्स

Updated on 24-May-2018
HIGHLIGHTS

क्वालकॉम ने या नवीन चिपसेट सह प्रीमियम आणि मिड-रेंज स्मार्टफोन्स पर्यंत ऑन-डिवाइस आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

यावर्षीच्या सुरवातीला MWC 2018 मध्ये क्वालकॉम ने स्नॅपड्रॅगन 700 मोबाइल प्लॅटफार्म सीरीज ची घोषणा केली होती आणि आता चिपमेकर ने या सीरीज चा पहिला चिपसेट स्नॅपड्रॅगन 710 सादर केला आहे. क्वालकॉम ने या नवीन चिपसेट सह प्रीमियम आणि मिड-रेंज स्मार्टफोन्स पर्यंत ऑन-डिवाइस आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 10nm प्रोसेस वर बनलेला स्नॅपड्रॅगन 710 मोबाईल प्लॅटफॉर्म मध्ये स्नॅपड्रॅगन 600 सीरीज च्या तुलनेत अनेक चांगले बदल करण्यात आले आहेत. 
क्वालकॉम टेक्नोलॉजीज च्या प्रोडक्ट मॅनेजमेंट चे वाईस प्रेसिडेंट Kedar Kondap ने सांगितले, “स्नॅपड्रॅगन 710 मोबाईल प्लॅटफार्म नवीन डिफाइन आणि महत्वपूर्ण 700-स्तरातील पहिला मोबाईल प्लॅटफार्म आहे, जो आमच्या प्रीमियम-स्तरीय मोबाईल प्लॅटफॉर्म्स मधील उपलब्ध सुविधा देतो. प्रमुख AI क्षमता आणि परफॉर्मन्स प्रगतीचा समावेश करून, स्नॅपड्रॅगन 710 आमच्या यूजर्सच्या प्रोडक्ट्सना पर्सनल असिस्टेंट मध्ये बदलण्यासाठी डिजाइन करण्यात आला आहे, जो रोजच्या महत्वपूर्ण यूजर एक्सपीरियंस ला वाढवतो, जसे की हाई-एंड कॅमेरा फीचर्स जे बॅटरी लाइफ कमी न करता ऑन-डिवाइस हाई स्पीड AI प्रोसेसिंगचा लाभ देईल."

परफॉर्मन्स 
हा चिपसेट 10nm प्रोसेस वर बनला आहे आणि यात ARM कोर्टेक्स टेक्निक वर बनलेला थर्ड जनरेशन कस्टम Kryo 360 CPU आहे. आठ कोर्स मधील दोन परफॉर्मन्स कोर्स आहेत ज्यांचा क्लॉक स्पीड 2.2GHz आहे आणि सहा एफिशिएन्सी कोर्स आहेत ज्यांचा क्लॉक स्पीड 1.7GHz आहे. क्वालकॉम चे म्हणने आहे की हा नवीन चिपसेट स्नॅपड्रॅगन 660 SoC च्या तुलनेत 20 टक्क्यांपर्यंत परफॉर्मन्स मध्ये सुधार, 15 टक्के जलद अॅप लॉन्च वेळ आणि 25 टक्केपर्यंत वेगवान वेब ब्राउजिंग ऑफर करतो. 
ग्राफिक्स साठी एड्रेनो 616 GPU आहे जो स्नॅपड्रॅगन 660 च्या तुलनेत 35 टक्क्यांपर्यंत जलद ग्राफिक रेंडरिंग ऑफर करतो आणि गेम खेळताना किंवा 4K HDR विडियो बघताना 40 टक्के पॉवर कंजम्प्शन कमी करतो. हा चिपसेट क्विक चार्ज 4+ टेक्निक ला पण सपोर्ट करतो ज्यामुळे 15 मिनीटांत बॅटरी 50 टक्के चार्ज करता येईल. 

आर्टिफिशियल इंटेलिजेंस
स्नॅपड्रॅगन 710 मल्टीकोर AI इंजिन सह येतो ज्या बद्दल कंपनी चे म्हणणे आहे की हा स्नॅपड्रॅगन 660 च्या तुलनेत AI अॅप्लीकेशन च्या परफॉर्मन्स मध्ये दुप्पट सुधार झाला आहे. 
हा चिपसेट डिवाइस च्या AI अॅप्लीकेशन वर वेगाने काम करतो. AI-इंजिन सह स्नॅपड्रॅगन नवीन सुधार पण सादर केले आहेत, ज्यात जलद फेस अनलॉक, बायोमेट्रिक, फोटो मध्ये ऑब्जेक्ट डिटेक्ट करने आणि बोकेह इफेक्ट चांगल्या पद्धतीने अॅड करने यांचा समावेश आहे. हा स्मार्ट अल्बम पण इनेबल करतो ज्यामध्ये AI फोटो घेतलेल्या जागा, चेहरे, पेट्स, लँडस्केप, आकाश, समुंद्र, हिरवळ इत्यादी डिटेक्ट करू शकतो. त्याचबरोबर यात विडियो स्टाइल ट्रान्सफर चा स्पीड वाढवण्यात आला आहे आणि हा तुमच्या फोटो मध्ये ऑगमेंटेड रियलिटी (AR) पण सामील करू शकतो. 

कनेक्टिविटी
Snapdragon 710 SoC X15 LTE मॉडेम सह येतो जो इतर चिपसेट वरील Cat 7 LTE च्या तुलनेत 2.5 पटीने वेगवान आहे. चांगल्या सिग्नल क्वालिटी आणि वेगवान डाउनलोड स्पीड साठी वापरण्यात आलेली 4X4 MIMO टेक्निक 800Mbps पर्यंतचा डाउनलोड स्पीड ऑफर करते. 

कॅमेरा 
आजकाल कॅमेरा स्मार्टफोन्स मधील एक महत्वपूर्ण भाग बनला आहे आणि नवीन स्पेक्ट्र 250 इंजिन ने तुम्ही चांगल्या क्वालिटी चे फोटो घेऊ शकता. हा लो-लाइट फोटोग्राफी मध्ये नॉइज रिडक्शन आणि इमेज स्टेबिलाइजेशन पण देतो. स्नॅपड्रॅगन 710 रियल-टाइम बोकेह इफेक्ट्स पण इनेबल करतो. 
हा चिपसेट 32 मेगापिक्सल पर्यंतचा सिंगल कॅमेरा आणि 20 मेगापिक्सल पर्यंतच्या डुअल कॅमेरा ला सपोर्ट करतो. हा सुपर स्लो मोशन विडियो कॅप्चर पण इनेबल करतो,… टक्क्यांपर्यंत लोअर पॉवर कंजम्पशन सह 4K UHD विडियो कॅप्चर आणि स्पीडी विडियो स्टाइल ट्रान्सफर ऑफर करतो. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :