चीनची इंटरनेट कंपनी Qihoo 360 आणि कूलपॅड स्मार्टफोन निर्माता कंपनीने Qiku सोबत मिळून अशी घोषणा केली आहे की, ती भारतात स्मार्टफोन्स विकायला सुरुवात करणार आहे. कंपनीचे म्हणणे आहे की,ती भारतात लवकरच आपले Qiku Terra 808 आणि Terra 810 स्मार्टफोन्स लाँच करेल.
स्मार्टफोन Terra 810 विषयी बोलायचे झाले तर, ह्यात ६ इंचाच्या QHD 1440×2560 पिक्सेल डिस्प्ले सह क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 810 प्रोसेसरसह 4GB चे रॅम असेल. स्मार्टफोनमध्ये 64GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा असेल आणि फोटोग्राफीसाठी ह्यात १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा सोनीच्या IMX278 सेंसरसह f/1.8 अॅपर्चर सह येईल. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा असेल. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये 3700mAh ची मोठी बॅटरी दिली गेली आहे.
तर Qiku Terra 808 क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 808 प्रोसेसर आणि 3GB रॅमसह येईल. स्मार्टफोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा सोनी IMX278 कॅमेरा f/1.8 अॅपर्चरसह दिला गेला आहे. आणि स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे.
स्मार्टफोन Qihoo 360 च्या स्वत:च्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो जो अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर आधारित आहे. ह्या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत आणि त्याची उपलब्धता किंवा लाँचबद्दल अजून कोणतीच माहिती समोर आली नाही आहे.