मोबाईल निर्माता कंपनी Qiku ने भारतीय मोबाईल बाजारात प्रवेश करण्यासोबत आपला नवीन स्मार्टफोन Q Terra भारतात लाँच केला आहे. Qiku कंपनी मोबाईल निर्माता कंपनी कूलपॅड आणि चीनची इंटरनेट कंपनी Qihoo 360 ने मिळून बनवले आहे. हा नवीन स्मार्टफोन गॅजेट्स 360 च्या माध्यमातून १९,९९९ रुपयांच्या किंमतीत निमंत्रणाच्या माध्यमातून मिळेल, तर निमंत्रणाशिवायसुद्धा हा स्मार्टफोन खरेदी केला जाऊ शकतो. मात्र तेव्हा हा आपल्याला २१,९९९ रुपयात खरेदी करावा लागेल. त्याचबरोबर कंपनीने अशी आशा व्यक्त केलीय, की हा भारतात २०० सर्विस सेंटरमध्ये सेल्स सपोर्ट देईल.
जर ह्याच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 6 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1920×1080 पिक्सेल आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 808 प्रोसेसर आणि 3GB ची रॅम दिली गेली आहे. ह्यात 16GB अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB वाढवता येऊ शकते.
ह्या स्मार्टफोनमध्ये मेटल यूनीबॉडी दिली गेली आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये मागच्या बाजूला फिंगरप्रिंट सेसर दिला गेला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे.
ह्यात ड्यूल सिम, 4G LTE, ब्लूटुथ 4.1 दिले आहे. ह्यात 3700mAh ची बॅटरी दिली गेली आहे, जी त्वरित चार्ज होते. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड ५.१ लॉलीपॉपवर चालतो.