लेटेस्ट iPhone 16 सीरीज प्री-ऑर्डर आजपासून भारतात सुरू होणार आहेत. कंपनीने नुकतेच 9 सप्टेंबर रोजी ही नवी सिरीज लाँच केली आहे. या सिरीज अंतर्गत iPhone 16, iPhone 16 प्रो, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro Max हे चार स्मार्टफोन मॉडेल्स सादर करण्यात आले आहेत. हे चारही स्मार्टफोन नवीन चिपसेटसह आणण्यात आले आहेत. तसेच, यावेळी सर्व फोनमध्ये नवीन कॅप्चर बटण देण्यात आले आहे, ज्याद्वारे तुम्ही फोटो क्लिक करण्यासोबतच अनेक गोष्टी व्यवस्थापित करू शकाल. एवढेच नाही तर या वर्षी कंपनीने विविध कॅमेरा मॉडेल्स आणि अनेक बदलांसह नवीन आयफोन सादर केले आहेत.
दरम्यान, आजपासून भारतीय या सीरिजचे सर्व स्मार्टफोन्स प्री-ऑर्डर करू शकतील. प्री-ऑर्डरवर लोकांना अनेक उत्तम ऑफर्स मिळतील, ज्यामध्ये तुम्हाला ही नवी सिरीज जरा कमी किमतीत खरेदी करता येईल. जाणून घ्या प्री-ऑर्डर तपशील, डिस्काउंट ऑफर आणि सर्व तपशील-
iPhone 16 सिरीजसाठी प्री-ऑर्डर आज म्हणजेच 13 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 5:30 वाजतापासून सुरू होणार आहेत. Apple च्या अधिकृत वेबसाइट आणि प्रसिद्ध Flipkart सारख्या ई-कॉमर्स वेबसाइटवरून या फोनची प्री-ऑर्डर सुरु केली जाऊ शकते. एवढेच नाही तर, तुम्ही ऑफलाइन Apple Store वरून iPhone 16 ची प्री-ऑर्डर देखील करू शकता. लक्षात घ्या की, iPhone 16 सीरीजची खुली विक्री 20 सप्टेंबर 2024 पासून सुरू होईल. प्री-ऑर्डर ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, American Express, Axis Bank आणि ICICI बँक कार्डद्वारे 5000 रुपयांची कॅशबॅक ऑफर मिळणार आहे.
लेटेस्ट iPhone 16 ची किंमत 79,900 रुपयांपासून सुरू होते. हे अल्ट्रामॅरिन, टील, पिंक, व्हाइट आणि ब्लॅक या पाच कलर ऑप्शन्ससह येते. तर, iPhone 16 Plus ची किंमत 89,900 रुपयांपासून सुरू होते. हे चार कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहे. याशिवाय, iPhone 16 pro ची सुरुवातीची किंमत 1,19,900 रुपये आहे. हे डेझर्ट टायटॅनियम, व्हाइट टायटॅनियम, नॅचरल टायटॅनियम आणि ब्लॅक टायटॅनियम कलर ऑप्शन्ससह लाँच करण्यात आले आहे. या सीरिजचे टॉप मॉडेल iPhone 16 Pro Max ची किंमत 1,44,900 रुपयांपासून सुरू होते. सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.