HDFC, ICICI, SBI आणि बँक ऑफ बडोदा कार्डवर 3,000 रुपयांपर्यंत सूट
Oppo Reno 8 आजपासून भारतीय बाजारात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाला आहे. Oppo Reno 8 ने या आठवड्याच्या सुरुवातीला Reno 8 Pro सोबत देशात एंट्री केली होती. मिड-रेंज रेनो सिरीज स्मार्टफोन MediaTek Dimensity 1300 प्रोसेसर आणि 8GB RAM ने समर्थित आहे. Reno 8 मध्ये 90Hz AMOLED डिस्प्ले आणि 50MP Sony IMX766 सेन्सर आहे.
स्मार्टफोनच्या इतर हायलाइट्समध्ये 32MP Sony IMX709 सेल्फी शूटर, ट्रिपल-रीअर कॅमेरा सेटअप आणि 80W SuperVOOC चार्जिंग यांचा समावेश आहे. भारतातील Oppo Reno 8 ची किंमत, प्री-ऑर्डर ऑफर, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स यावर एक नजर टाकुयात…
Oppo Reno 8 केवळ Flipkart वर आणि Oppo Store द्वारे प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असेल. लॉन्च ऑफर म्हणून, कंपनी HDFC, ICICI, SBI आणि बँक ऑफ बडोदा या कार्ड्सवर 3,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे.
OPPO RENO 8 ची किंमत
Oppo Reno 8 एकाच व्हेरिएंटमध्ये येतो, ज्यात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज समाविष्ट आहे. त्याची किंमत 29,999 रुपये आहे.
OPPO RENO 8 Specs
Reno 8 आणि Reno 8 Pro फार वेगळे नाहीत. सर्वप्रथम, यात प्लॅस्टिक बिल्ड आहे, तर प्रो मॉडेलला ग्लास बॅक मिळतो. यात तुम्हाला तुम्हाला 90Hz रिफ्रेश रेटसह फुल-एचडी रिझोल्यूशन (2,400×1,080 पिक्सेल) सह 6.4-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले मिळेल. फोनमध्ये तुम्हाला MediaTek 1300 प्रोसेसर दिला जात आहे.
फोनच्या ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपमध्ये समान सेन्सर आहे. तुम्हाला फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट सेंसरसुद्धा मिळत आहे. यात 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह 4,500mAh बॅटरी देखील मिळते.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.