साउथ कोरियाची स्मार्टफोन निर्माता कंपनी LG चा मोड्यूलर स्मार्टफोन G5 आता भारतातही प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाला आहे. आपण फ्लिपकार्टवर ह्याची प्री-बुकिंग करु शकता.
साउथ कोरियाची स्मार्टफोन निर्माता कंपनी LG चा मोड्यूलर स्मार्टफोन G5 आता प्री-बुकिंगमध्ये उपलब्ध झाला आहे. आपण फ्लिपकार्ट वर जाऊन ह्या स्मार्टफोनची प्री-बुकिंग करु शकता. ह्या स्मार्टफोनला २१ मे ते ३० पर्यंत बुक केले जाऊ शकते.
ह्या स्मार्टफोनसाठी जे लोक प्री-बुकिंग करत आहेत, त्यांना कॅम प्लस मोफत दिला जाईल. ह्या स्मार्टफोनची किंमत फ्लिपकार्टवर ५२,९९० रुपये सांगण्यात येत आहे. लिस्टिंगनुसार, ह्या स्मार्टफोनला १ जूनला लाँच केले जाईल असे सांगण्यात येतय, मात्र ह्याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
मोबाईल निर्माता कंपनी LG ने MWC 2016 च्या दरम्यान नवीन स्मार्टफोन G5 लाँच केला होता. कंपनीने अशी माहिती दिली आहे की, LG G5 स्मार्टफोन पुढील ३ महिन्यात हा भारतात लाँच करेल असे सांगण्यात आले होते. हा स्मार्टफोन आता पर्यतचा सर्वात जास्त म्हणजेच क्वाल-कॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर असलेला स्मार्टफोन आहे.
ह्या स्मार्टफोनच्या डिझाईनविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनला एका खास डिझाईनसह लाँच केले आहे. ह्या स्मार्टफोनला मेटल बॉडीसह स्लीक डिझाईनसह बाजारात आणले आहे.
त्याशिवाय ह्यात स्लाइड आउट रिमूव्हेबल बॅटरी दिली गेली आहे, ज्याने ह्या स्मार्टफोनच्या बॅटरीला एका स्लायडरप्रमाणे बाहेर काढू शकतो. त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये १३५ डिग्री वाइड अँगल्स लेन्स दिले आहे, ज्याच्या माध्यमातून आपण उत्कृष्ट फोटो काढू शकता.