पोर्टोनिक्स ने लॉन्च केला फिटनेस ट्रॅकर ‘योग प्लस’, किंमत 2499 रुपये
‘योग प्लस’ फक्त तुमची ओवरऑल फिनेटस ट्रॅक करत आणि मोजत नाही तर हा तुमच्यासाठी रीमांडर्स, सोशल मीडिया आणि फोन कॉल अलर्ट साठी दैनंदिन मदतनीसाप्रमाणे काम करतो. तुमच्या शरिरातील रक्ताभिसरणात कमी असल्यास तीदेखील हा तुम्हाला सांगतो.
पोर्टोनिक्स आपल्या फिटनेस ट्रॅकर्स ‘योग’ ची नवी सीरीज घेऊन आली आहे. या सिरीज मध्ये पोर्टोनिक्स ने अगदी नवीन ‘योग प्लस’ लॉन्च केला आहे. स्मार्ट आणि स्लीक ‘योग प्लस’ ची किंमत 2499 रुपये आहे. ‘व्हॉट गेट्स मेजर्ड, गेट्स डन’ सिद्धांतावर चालत ‘योग प्लस’ संपूर्ण फिटनेस मिळवण्यात तुम्हाला मदत करेल. हा फिटनेस ट्रॅकर रोजच्या आधारावर फिटनेस रिपोर्ट तयार करण्यास उपयोगी पडतो. हा रनिंग किंवा जॉगिंग मध्ये अंतर मोजण्यासोबतच बर्न झालेल्या कॅलरी पण मोजतो आणि त्याचबरोबर तुमच्या रोजच्या स्लीप सायकल वर पण नजर ठेवतो.
‘योग प्लस’ फक्त तुमची ओवरऑल फिनेटस ट्रॅक करत आणि मोजत नाही तर हा तुमच्यासाठी रीमांडर्स, सोशल मीडिया आणि फोन कॉल अलर्ट साठी दैनंदिन मदतनीसाप्रमाणे काम करतो. तुमच्या शरिरातील रक्ताभिसरणात कमी असल्यास तीदेखील हा तुम्हाला सांगतो.
नवीन लॉन्च बदल पोर्टोनिक्सचे प्रवक्ते म्हणाले कि, ‘‘ पोर्टोनिक्स ‘योग प्लस’ बाजारातील सर्व फिटनेस ब्रॅण्ड्सच्या तुलनेत सर्वात सरळ चार्जिंग मॅकॅनिज्म वर चालतो याची हमी देते. ‘योग प्लस’ 5वी/500 एमए यूएसबी वॉल ऍडॉप्टर ने सहज चार्ज केले जाऊ शकते. यासाठी ‘योग प्लस’ डायल यूएसबी ऍडॉप्टर मध्ये इन्सर्ट करायचा असतो.’’
‘योग प्लस’ धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे आणि आईपी67 स्टॅंडर्ड फॉलो करतो. हलका पाऊस आणि घामात पण हा कोणत्याही अडचणीविना काम करू शकतो. हा वेरीफिट प्रो मोबाईल ऍपच्या माध्यमातून तुमची प्रत्येक एक्टीविटी तुमच्या स्मार्टफोन वर ट्रॅक तसेच कंट्रोल करण्याचे स्वातंत्र्य देतो.
तुम्ही ‘योग प्लस’ च्या माध्यमातून रोज सहा रिमांडर्स टाकू शकता आणि सोशल मीडिया मेसेजस, एसएमएस, ईमेल्स, मिस्ड कॉल्स, रीमाइंडर्स आणि फिटनेस गोल्सच्या नोटीफिकेशन चेक करू शकता.
जेव्हा तुम्ही तुमच्या ‘योग प्लस’ ला स्लीप मोड वर टाकता तेव्हा यातील सेंसर मॉनिटर्स तुमचा स्लीप पॅटर्न मॉनिटर करतात आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला याची योग्य माहिती देतात. ‘योग प्लस’ तुमच्या स्मार्टफोनशी ब्ल्यूटुथ 4.0 ने कनेक्ट होतो. एकदा पूर्णपणे चार्ज केल्यावर सात दिवस न थांबता हा चालू शकतो.
अनेक शानदार फीचर्स असलेल्या 17 ग्राम वजनी ‘योग प्लस’ ने फोटो घेऊन तुम्ही तुमच्या स्मार्टफोन वर ट्रांसफर करू शकता पण यासाठी तुमचा स्मार्टफोन तसेच ‘योग प्लस’ मधील अंतर 10 मीटर असणे आवश्यक आहे. पोर्टोनिक्स ‘योग प्लस’ क्लासी ब्लॅक रंगात येतो आणि याची किंमत 2499 रुपये ठेवण्यात आली आहे. हा देशातील सर्व ऑफलाइन आणि ऑनलाइन स्टोर्स वरून विकत घेता येईल. हा कॉर्पोरेट गिफ्टिंग साठी कंपनीच्या लोगो सह कस्टमाइज्ड स्वरूपात पण उपलब्ध होऊ शकतो.