प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Pocoची आगामी स्मार्टफोन सिरीज POCO X7 सिरीज 9 जानेवारी 2025 रोजी भारतात लाँच होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या सीरीज अंतर्गत कंपनी POCO X7 आणि POCO X7 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच करेल. दोन्ही स्मार्टफोन इ-कॉमर्स साईट Flipkart च्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध असतील. दरम्यान, कंपनीने आता या सिरीजचाय स्मार्टफोन्समध्ये उपलब्ध असलेल्या खास वैशिष्ट्यांचा खुलासा केला आहे. तसेच, फोनची अपेक्षित किंमत देखील लीक झाली आहे. पाहुयात सविस्तर-
Also Read: iPhone SE 4 स्मार्टफोनची लाँचपूर्वीच किंमत Leak! फोनचे Special स्पेसिफिकेशन्स देखील उघड
आम्ही तुम्हाला सांगतो की, POCO चा आगामी POCO X7 Pro स्मार्टफोन प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर सूचिबद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे या फोनबद्दल बहुतांश माहिती फोन लाँच होण्याच्या आधीच पुढे आली आहे. स्मार्टफोनच्या कन्फर्म स्पेक्सबरोबरच या फोनची किंमत देखील ऑनलाईन लीक करण्यात आली आहे. फोनची किंमत 30 हजार रुपयांपेक्षा कमी असेल, असे नमूद करण्यात आले आहे. मात्र, या फोनची नेमकी किंमत काय? हे फोन लाँच झाल्यावरच कळेल.
वर सांगितल्याप्रमाणे, Flipkart लिस्टींगद्वारेया फोनचे महत्त्वाचे फीचर्स पुढे आले आहेत. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, कंपनी आगामी POCO X7 Pro स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 8400 Ultra प्रोसेसर देणार आहे. याशिवाय, कंपनीने पुष्टी केली आहे की, स्मार्टफोनमध्ये 6550mAh बॅटरी असेल. या बॅटरी पॅकसह येणारा हा भारतातील पहिला स्मार्टफोन असणार आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, फोनच्या ग्लोबल व्हेरिएंटमध्ये 6000mAh बॅटरी दिली जाईल. तसेच, अहवालांवर विश्वास ठेवल्यास, या फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा 1.5k LTPO OLED डिस्प्ले मिळेल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये OIS सपोर्टसह 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड अँगल आणि 20MP फ्रंट कॅमेरा देखील आहे. मात्र, फोनचे खरे स्पेसिफिकेशन्स हा फोन लाँच झाल्यांनतरची पुढे येतील.