108MP कॅमेरासह POCO X6 Neo भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स। Tech News
POCO X6 Neo आज भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे.
स्मार्टफोनची अर्ली ऍक्सेस सेल आज संध्याकाळी 7 वाजता Flipkart वर सुरू
स्मार्टफोनवर HDFC आणि ICICI बँक कार्डवर 3500 रुपयांपर्यंत सूट
POCO ने नवीन POCO X6 Neo आज भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. हा फोन लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart द्वारे विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जातील. हा स्मार्टफोन 20,000 रुपयांच्या अंतर्गत लाँच करण्यात आला आहे. या किमतीत पोकोच्या या स्मार्टफोनमध्ये 108MP मुख्य कॅमेरा आहे. याशिवाय हा स्मार्टफोन शक्तिशाली प्रोसेसर आणि मजबूत बॅटरीसह येतो. जाणून घेऊयात फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.
हे सुद्धा वाचा: Realme Narzo 70 Pro 5G ची भारतीय लाँच डेट कन्फर्म! Early Bird सेल ऑफर्सची घोषणा, अप्रतिम बड्स मिळतील Free। Tech News
POCO X6 Neo ची किंमत
Poco X6 Neo दोन व्हेरिएंटसह लाँच करण्यात आला आहे. या फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 128GB स्टोरेज आहे, जो 19,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. तर, 12GB रॅम आणि 256GB सह टॉप व्हेरिएंट भारतात 21,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. Poco चा हा नवीन स्मार्टफोन Astral Black, Horizon Blue आणि Martian Orange या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये आणण्यात आला आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, या स्मार्टफोनची अर्ली ऍक्सेस सेल आज संध्याकाळी 7 वाजता Flipkart वर सुरू होईल. फोनवरील उपलब्ध ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, स्मार्टफोनवर HDFC आणि ICICI बँक कार्डवर 3500 रुपयांपर्यंत सूट दिली जाईल.
POCO X6 Neo चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
POCO X6 Neo फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश दर 120Hz आहे. स्मार्टफोन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह आणला गेला आहे. याशिवाय, सुरळीत कामकाजासाठी फोन MediaTek Dimensity 6080 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोनमध्ये 12GB रॅमसह 256GB पर्यंत स्टोरेज आहे. स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो SD कार्ड स्लॉट देखील उपलब्ध आहे. तुम्हाला 1TB पर्यंत स्टोरेज वाढवता येईल.
फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 108MP मुख्य कॅमेरा आणि मागील बाजूस 2MP डेप्थ लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. या Poco फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. हे 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी यात USB टाइप-C पोर्ट, 3.5 मिमी हेडफोन जॅक, Wi-Fi आणि ब्लूटूथ उपलब्ध आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile