108MP कॅमेरासह येणाऱ्या लेटेस्ट Poco X6 Neo 5G ची पहिली Sale आजपासून होणार सुरु, मिळतील Best ऑफर्स 

108MP कॅमेरासह येणाऱ्या लेटेस्ट Poco X6 Neo 5G ची पहिली Sale आजपासून होणार सुरु, मिळतील Best ऑफर्स 
HIGHLIGHTS

Poco X6 Neo 5G ची पहिली सेल आजपासून भारतात सुरु होणार

HDFC, ICICI आणि SBI बँकेकडून 1000 रुपयांची सूट

स्टोरेज मायक्रो SD कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येईल.

Poco ने अलीकडेच Poco X6 Neo 5G हा कंपनीचा नवीनतम स्मार्टफोन लाँच केला आहे. आज म्हणजेच 18 मार्च रोजी या हँडसेटची पहिली सेल सुरु होणार आहे. पहिल्या सेलदरम्यान तुम्हाला या स्मार्टफोनवर अनेक ऑफर्स मिळणार आहेत, यासह तुम्ही हा स्मार्टफोन आणखी स्वस्तात खरेदी करू शकता. मोबाइल फोनमध्ये फोटोग्राफीसाठी तुम्हाला 108MP कॅमेरा मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात या फोनची किंमत आणि पहिल्या सेलमध्ये मिळणारे ऑफर्स-

POCO X6 Neo 5G with 108mp dual camera launched in India
POCO X6 Neo 5G with 108mp dual camera launched in India

Poco X6 Neo 5G किंमत आणि ऑफर

फोनची विक्री आज दुपारी 12 वाजल्यापासून शॉपिंग वेबसाइट Flipkart वर लाइव्ह होईल. स्मार्टफोन ब्रँड Poco नुसार Poco X6 Neo ची किंमत 8GB + 128GB स्टोरेजसाठी 19,999 रुपये इतकी आहे. तर, 12GB + 256GB स्टोरेजसाठी 21,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर HDFC, ICICI आणि SBI बँकेकडून 1000 रुपयांची सूट मिळत आहे. तसेच, हँडसेटवर 563 रुपये प्रति महिना नो-कॉस्ट EMI ऑफर केले जात आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा नवीन स्मार्टफोन Astral Black, Horizon Blue आणि Martian Orange कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.

Poco X6 Neo 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Poco X6 Neo 5G फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिफ्रेश रेट 120Hz आहे. सुरक्षेसाठी यात फिंगरप्रिंट सेन्सरसह फेस अनलॉकची सुविधा आहे. याच्या स्क्रीनवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन ग्लासही बसवण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा मोबाईल MediaTek Dimensity 6080 चिपसेटसह येतो.

Poco X6 Neo Specification
Poco X6 Neo Specification

स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये उपलब्ध 256GB अंतर्गत स्टोरेज मायक्रो SD कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते. फोटोग्राफीसाठी, हँडसेटमध्ये 108MP सह 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तर, सेल्फीसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5000mAh ची मजबूत बॅटरी दिली आहे, जी 33W फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह येते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo