POCO X6 सिरीज ‘या’ दिवशी होणार भारतात लाँच, तुमच्यासाठी Affordable असणार की नाही? Tech News
आगामी POCO X6 सिरीजची भारतीय लाँच डेट जाहीर
अधिकृत पोस्टरनुसार Poco 11 जानेवारी रोजी भारतात Poco X6 सिरीज लाँच करेल.
POCO X6 Pro मॉडेलमध्ये OIS सह ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो.
प्रसिद्ध POCO ब्रँडने एक टीझर जारी केला होता. कंपनी नवीन वर्षात आपल्या फोनच्या नवीन सिरीजसह आगमन करेल, असे या टिझरद्वारे सूचित करण्यात आले आहे. आता कंपनीने आपल्या आगामी POCO X6 सिरीजच्या भारतीय लाँच डेटचे अधिकृतपणे अनावरण केले आहे. Poco X6 आणि Poco X6 Pro नवीन सीरीज अंतर्गत लाँच केले जाऊ शकतात. मात्र, कंपनीने अद्याप या सिरीजअंतर्गत येणाऱ्या स्मार्टफोन्सची पुष्टी केलेली नाही.
रिपोर्टनुसार, या सिरीज अंतर्गत Poco X6 Pro स्मार्टफोन Redmi Note 13 Pro च्या रीब्रँडेड आवृत्तीसह लाँच केला जाऊ शकतो. तर, Poco X6 फोन Redmi Note 13 5G चे रीब्रँडेड व्हर्जन म्हणून सादर केला जाऊ शकतो. लक्षात घ्या की, Redmi चे हे मॉडेल चीनमध्ये सप्टेंबर महिन्यात लॉन्च करण्यात आले होते.
हे सुद्धा वाचा: लाँच झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच iPhone 15 झाला 9 हजार रुपयांनी स्वस्त, अशी ऑफर पुन्हा मिळणार नाही। Tech News
POCO X6 सीरिजचे लॉन्चिंग डिटेल्स
Flipkart वर दिसलेल्या अधिकृत पोस्टरनुसार Poco 11 जानेवारी रोजी भारतात Poco X6 सिरीज सादर करेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, या सीरिजचे स्मार्टफोन्स अलीकडच्या काळात अनेक लीक आणि अफवांच्या माध्यमातून समोर आले आहेत. लीक आणि अफवांद्वारे आगामी सिरीजबद्दल बहुतेक माहिती आधीच सार्वजनिक करण्यात आली आहे. मात्र, आता स्मार्टफोनच्या लाँचची अधिकृत पुष्टी देखील झाली आहे.
POCO X6 चे संभावित तपशील
ब्रँड POCO X6 सिरीजच्या दोन्ही उपकरणांमध्ये 6.67-इंच लांबीचा OLED स्क्रीन देऊ शकतो. POCO X6 Pro मध्ये MediaTek Dimensity 8300 Ultra chipset मिळण्याची अपेक्षा आहे. तर Snapdragon 7S Gen 2 प्रोसेसर बेस मॉडेल Poco X6 मध्ये मिळू शकतो. दोन्ही फोन 16GB LPDDR5X RAM आणि 512GB पर्यंत इंटर्नल स्टोरेजसह मिळण्याची शक्यता आहे.
फोटोग्राफीसाठी, POCO X6 Pro मॉडेलमध्ये OIS सह ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो. ज्यामध्ये 200MP प्रायमरी कॅमेरा, 8MP सेकंडरी आणि 2MP इतर लेन्स दिले जाऊ शकतात. तसेच, जर आपण POCO X6 बद्दल बोललो तर याला OIS सह ट्रिपल रियर कॅमेरा देखील दिला जाऊ शकतो. जे 64MP प्रायमरी, 8MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सरने सुसज्ज असेल.
याव्यतिरिक्त, दोन्ही फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा असण्याची अपेक्षा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, POCO X6 Pro मध्ये 90W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,500mAh बॅटरी दिली जाऊ शकते. तर, POCO X6 मध्ये 67W फास्ट चार्जिंगसह 5,100mAh बॅटरी मिळण्याची शक्यता आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile