स्मार्टफोन ब्रँड Poco ने आपली स्मार्टफोन सीरीज X वाढवली आहे. कंपनीने आता नवीन POCO X5 सीरीज आणली आहे. या सिरीजतर्गत, POCO X5 Pro 5G जागतिक स्तरावर लाँच करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया फोनची इतर वैशिष्ट्ये आणि किंमत…
हे सुद्धा वाचा : Instagram अकाउंट कसे डिलीट कराल? 'ही' आहे संपूर्ण प्रक्रिया
POCO X5 Pro 5G मध्ये पंच-होल डिझाइनसह 6.67-इंच लांबीचा फुल HD प्लस Xfinity AMOLED डिस्प्ले मिळतो. डिस्प्ले 1080 x 2400 पिक्सेल, 120 Hz रिफ्रेश रेट आणि 900 nits पर्यंत कमाल ब्राइटनेसला सपोर्ट करतो. डिस्प्लेसह गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन देखील आहे. फोनमध्ये सुरक्षिततेसाठी फेस अनलॉक सपोर्ट आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे. POCO X5 Pro 5G स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर 8GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 256GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेजसह समर्थित आहे. फोन Android 12 OS सह प्री-इंस्टॉल केलेला आहे.
Poco X5 Pro 12-लेयर ग्रेफाइट शीट हीट डिप्रेशन युनिट, ड्युअल सिम सपोर्ट, 5G, Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.1, एक IR ब्लास्टर आणि X-axis लिनियर मोटर यासारखी फीचर्स ऑफर करतो. फोनमध्ये USB टाइप-C पोर्ट, डॉल्बी ATMOS सपोर्टसह ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅकसाठी सपोर्ट आहे.
याव्यतिरिक्त, फोनमध्ये 108-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. फोनच्या पुढील बाजूस 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
हा फोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये येतो. फोनच्या 8 GB रॅमसह 128 GB स्टोरेजची किंमत 22,999 रुपये आणि 8 GB रॅमसह 256 GB स्टोरेजची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. फोनद्वारे क्रेडिट कार्ड पेमेंटवर 2,000 रुपयांची सूट मिळेल. एक्सचेंज ऑफरवर कंपनी 2,000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील देत आहे. याशिवाय, ICICI बँकेचे ग्राहक फोनच्या खरेदीवर 2,000 टक्क्यांपर्यंत झटपट सूट घेऊ शकतात. हा फोन Astral Black, Horizon Blue आणि Poco Yellow कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे.