Poco चा नवीन स्वस्त 5G फोन, 64MP ट्रिपल कॅमेरा आणि दमदार बॅटरीसह क्वालकॉम प्रोसेसर

Updated on 13-Nov-2022
HIGHLIGHTS

भारतीय बाजारात Poco X5 नवीन 5G स्मार्टफोन लाँच होणार

Poco X5 आता ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स BIS आणि FCC वेबसाइटवर दिसले.

फोनमध्ये स्क्वेअर कॅमेरा मॉड्यूल डिझाइन मिळेल.

चीनी टेक कंपनी Pocoचा भारतीय स्मार्टफोन बाजारात मोठा पोर्टफोलिओ आहे आणि लवकरच नवीन 5G स्मार्टफोन समाविष्ट करू शकतो. कंपनी लवकरच भारतीय बाजारात Poco X5 लाँच करणार आहे. लॉन्च होण्यापूर्वीच या फोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

हे सुद्धा वाचा : 50MP कॅमेरा असलेला Realme 5G स्मार्टफोनची मार्केटमध्ये एंट्री, किंमतही तुमच्या बजेटमध्ये…

एका नवीन अहवालात असे म्हटले आहे की, Poco X5 आता ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स BIS आणि FCC वेबसाइटवर दिसून आले आहे. MySmartPrice नुसार, डिव्हाइस या दोन्ही वेबसाइटवर मॉडेल क्रमांक 22101320I आणि 22101320G सह दिसले आहे. FCC लिस्टिंगने उघड केले आहे की, फोनमध्ये स्क्वेअर कॅमेरा मॉड्यूल डिझाइन आणि ड्युअल-बँड वायफायसाठी समर्थन असेल.

5G बँड सपोर्टसह येईल Poco X5

 FCC सूचीवरून असे दिसून आले आहे की, Poco चे नवीन 5G डिव्हाइस n5, n7, n38, n41, n77 आणि n78 5G बँडना सपोर्ट करेल. MIUI 14 सह लाँच करण्यात आलेला डिव्हाइसचा भारतीय व्हेरिएंट, BIS प्लॅटफॉर्मवर मॉडेल क्रमांक 22101320I सह दिसला आहे. मात्र, येथून डिव्हाइसचे कोणतेही फिचर उघड झाले नाही.

संभावित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

नवीन Poco स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच लांबीचा IPS LCD डिस्प्ले मिळू शकतो, जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल. या डिव्हाइसमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 765G चिपसेट मिळण्याची चर्चा आहे, ज्यामध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळू शकते. याव्यतिरिक्त, फोनच्या मागील पॅनलवर क्वाड-कॅमेरा सेटअप आढळू शकतो, ज्यामध्ये 64MP प्रायमरी लेन्स व्यतिरिक्त, 13MP अल्ट्रा-वाइड सेन्सर, 5MP तिसरा आणि 2MP चौथा डेप्थ किंवा मॅक्रो सेन्सर दिला जाऊ शकतो. Poco X5 मध्ये 16MP सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. कंपनी फोनच्या 5,000mAh बॅटरीला फास्ट चार्जिंग सपोर्ट देऊ शकते.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :