digit zero1 awards

त्वरा करा ! POCO X4 Pro 5G वर 32% भारी सूट, विशेष ऑफर FLIPKART वर उपलब्ध

त्वरा करा ! POCO X4 Pro 5G वर 32% भारी सूट, विशेष ऑफर FLIPKART वर उपलब्ध
HIGHLIGHTS

फ्लिपकार्टवर POCO X4 Pro 5G स्वस्तात खरेदी करा.

POCO X4 Pro 5G ची किंमत 15,499 रुपये आहे.

एक्स्चेंज ऑफरमध्ये POCO X4 Pro 5G आणखी स्वस्त खरेदी करा.

FLIPKART सध्या 5G स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. तुम्हालाही नवीन फोन खरेदी करायचा असेल तर, तुम्ही फ्लिपकार्टवर सर्वोत्तम डिल्स आणि ऑफरसह स्मार्टफोन्स खरेदी करू शकता. होय, सध्या POCOच्या 5G पोर्टफोनवर विशेष सवलत देण्यात येत आहेत. POCO X4 Pro 5G ची किंमत 22,999 रुपयांवरून 15,499 रुपये करण्यात आली आहे. फ्लिपकार्ट सध्या या स्मार्टफोनवर मोठ्या ऑफर देत आहे.

हे सुद्धा वाचा : Xiaomi 13 Pro आज भारतात होणार लाँच, इव्हेंटचे लाइव्ह स्ट्रीम कधी आणि कुठे पाहता येईल…

POCO X4 PRO 5G ची किंमत 

हा POCO स्मार्टफोन सध्या फ्लिपकार्टवर 32% सवलतीवर उपलब्ध आहे, त्याची किंमत 22,999 रुपयांवरून 15,499 रुपयांपर्यंत खाली आणली आहे. ईकॉमर्स प्लॅटफॉर्म या स्मार्टफोनवर एक्सचेंज आणि बँक डील देखील ऑफर करतो. तुम्ही चांगल्या स्थितीतील स्मार्टफोन एक्सचेंज करून POCO X4 Pro 5G वर Rs 14,850 पर्यंत सूट मिळवू शकता.

Poco X4 Pro हे 20 हजार रुपयांच्या श्रेणीतील एक उत्तम गॅजेट आहे. डिव्हाइसमध्ये 6GB RAM आणि स्टॅंडर्ड CPU कॉन्फिगरेशन असल्याने, तुम्ही एक सुरळीत ऑपरेटिंग अनुभवाची अपेक्षा करू शकता.

POCO X4 PRO चे स्पेक्स 

  Poco ने स्मार्टफोनमध्ये 6.7-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट, 360Hz टच सॅम्पलिंग रेट, 1200 nits पीक ब्राइटनेस, Gorilla Glass 5 प्रोटेक्शनसह येतो. स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे, 8GB LPDDR4x रॅम, 128GB UFS 2.2 स्टोरेज आणि 5000mAh बॅटरी जी 67W जलद चार्जिंगला समर्थन देते.

फोनच्या मागील बाजूस 64MP प्राथमिक कॅमेरा आहे जो 8MP 118 डिग्री अल्ट्रावाइड कॅमेरा देईल आणि डिव्हाइसमध्ये 2MP मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या पुढील बाजूस 16MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे.

यामध्ये सात 5G बँड, 3.5 मिमी ऑडिओ जॅक, USB टाइप-C 2.0 पोर्ट आणि 1 TB पर्यंत सपोर्ट करणारे मायक्रो SD कार्ड स्टोरेज, 11 GB टर्बो रॅम, वायफाय एसी, ड्युअल स्पीकर, ब्लूटूथ 5.1 आणि इन्फ्रारेड समाविष्ट आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo