Poco चा नवीन स्मार्टफोन Poco X4 GT लवकरच भारतीय बाजारात दाखल होऊ शकतो. अलीकडेच हा आगामी स्मार्टफोन ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) वर दिसला. या सर्टिफिकेशन वेबसाइटनुसार, फोनचा मॉडेल नंबर 22041216I आहे. मात्र, या लिस्टमध्ये फोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशनबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. BIS सर्टिफिकेशनमध्ये फोनच्या लिस्टमुळे कंपनी हा भारतात नक्कीच लाँच करेल, याची पुष्टी झाली आहे. फोनच्या लाँच तारखेबद्दल Poco कडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
टिपस्टर मुकुल शर्माने त्याच्या ट्विटर हँडलद्वारे Poco X4 GT च्या BIS लिस्टिंगची माहिती दिली. शर्मा यांनी सांगितले की, या फोनला BISचे दोन्ही अप्रूव्हल मिळाले आहेत. मात्र, लिस्टिंगमध्ये फोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु त्याच्या मॉडेल नंबरवरून असे नक्कीच म्हणता येईल की, कंपनीने हा फोन खास भारतासाठी डिझाइन केला आहे.
तसेच मुकुल शर्माच्या मते, कंपनीचा हा फोन Xiaomi 12X किंवा Xiaomi 12i ची रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो. दुसरीकडे, काही रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की, Poco X4 GT ची ग्लोबल लाइनअप Redmi Note 11T Pro ची रीब्रँडेड आवृत्ती असेल.
हे सुद्धा वाचा : 17 OTT आणि 350 TV चॅनेलचा लाभ देतील हे '3' Airtel Xstream प्लॅन, बघा किंमत
कंपनी फोनमध्ये 6.6-इंच लांबीचा फुल HD + LCD पॅनल देऊ शकते. हा डिस्प्ले 144Hz च्या रिफ्रेश रेटसह येऊ शकतो. फोन 8 GB पर्यंत रॅम आणि 256 GB अंतर्गत स्टोरेजसह लाँच केला जाईल, असा अंदाज आहे. प्रोसेसर म्हणून यात Dimensity 8100 चिपसेट मिळणे अपेक्षित आहे. फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये LED फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देणार असल्याचेही बोलले जात आहे.
यात 48-मेगापिक्सेल प्रायमरी लेन्ससह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ किंवा मॅक्रो कॅमेरा दिला जाऊ शकतो. दरम्यान, कंपनी सेल्फीसाठी या फोनमध्ये 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्याची शक्यता आहे. फोनला पॉवर देण्यासाठी कंपनी यामध्ये 5000mAh बॅटरी देऊ शकते, जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. OS बद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन Android 12 वर आधारित MIUI 13 वर काम करेल.