जबरदस्त ! 8GB RAM सह Poco X4 GT लाँच, रु. 6,500 कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी

जबरदस्त ! 8GB RAM सह Poco X4 GT लाँच, रु. 6,500 कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी
HIGHLIGHTS

Poco कडून Poco X4 GT लाँच

स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत अंदाजे 31,200 रुपये

स्मार्टफोन 6,500 रुपयांनी कमी किमतीत खरेदी करण्याची संधी

Poco X4 GT हे Poco X4 Pro 5G नंतर X4 सिरीजमधील दुसरे डिवाइस आहे. Poco X4 GT जागतिक स्तरावर Poco X4 5G सोबत लाँच करण्यात आला होता, जो भारतात देखील लाँच करण्यात आला. हा पोकोचा नवीन मिड-रेंज फोन आहे, हा फोन मीडियाटेक डायमेंसिटी 8100 प्रोसेसरसह येतो. या व्यतिरिक्त, फोन 144Hz स्क्रीन रिफ्रेश रेट डिस्प्लेसाठी समर्थनासह येतो आणि यात डॉल्बी व्हिजनसाठी देखील समर्थन आहे. हे उपकरण लवकरच भारतात Redmi K50i म्हणून लाँच होण्याची अपेक्षा आहे. चला तर जाणून घेऊयात फोनच्या स्पेसिफिकेशन आणि किंमतीबद्दल सविस्तर माहिती… 

हे सुद्धा वाचा : स्वस्त दरात आली Amazfit स्मार्टवॉच, मिळेल तब्बल 14 टिकणारी बॅटरी आणि 60 हून अधिक स्पोर्ट्स मोड

Poco X4 GT ची किंमत

Poco X4 ची 8GB+128GB व्हेरियंटसाठी किंमत EUR 379 म्हणजेच अंदाजे 31,200 रुपये आहे. आणि 8GB+256GB व्हेरियंटसाठी किंमत EUR 429 म्हणेजच अंदाजे 35,300 रुपयांपासून सुरू होते. अर्ली बर्ड सेल अंतर्गत या उपकरणाची किंमत EUR 80 म्हणजेच अंदाजे रु. 6,500 रुपयांनी कमी असेल. हा स्मार्टफोन ब्लू, ब्लॅक आणि सिल्व्हर कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.

poco x4 gt

Poco X4 GT चे बेसिक स्पेसिफिकेशन 

फोनमध्ये 6.6-इंच फुल HD+ LCD स्क्रीन आहे, ज्यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि 20.5:9 आस्पेक्ट रेशो आहे. हे उपकरण डॉल्बी व्हिजनलाही सपोर्ट करते. हुड अंतर्गत, X4 GT मीडियाटेक डायमेन्सिटी 8100 चिपसेटसह सुसज्ज आहे, ज्यामध्ये चार प्रीमियम आर्म कॉर्टेक्स-A78 कोर 2.85GHz क्लॉक स्पीडसह आणि चार Cortex-A55 कोर आहेत.

याशिवाय हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेजसह येईल. यात 5080mAh बॅटरी 67W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे. फोटोग्राफीसाठी, फोन 64MP मेन कॅमेरा, 8MP वाइड-एंगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्ससह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप ऑफर करतो. फ्रंटला 16MP सेल्फी कॅमेरा आहे.

सॉफ्टवेअरच्या बाबतीत, फोन MIUI 13 वर आधारित Android 12 OS वर चालतो. इतर वैशिष्ट्यांमध्ये IP53 रेटिंग, X-Axis मोटर, एक 3.5mm हेडफोन जॅक, Dolby Atmos, X-axis लिनियर मोटर, Hi-Res ऑडिओ सपोर्ट, Wi-Fi 6, Bluetooth 5.3 आणि VC लिक्विड कूलिंग यांचा समावेश आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo