नवीनतम Poco Pad 5G भारतीय बाजारात दाखल, तब्बल 10,000mAh बॅटरीसह पॉवरफूल फीचर्स उपलब्ध

Updated on 26-Aug-2024
HIGHLIGHTS

Poco Pad 5G नुकतेच भारतीय बाजारपेठेत लाँच

Poco Pad 5G ची विक्री 27 ऑगस्ट 2024 पासून लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर सुरू होईल.

Poco Pad 5G वर कंपनी 'Times Prime' ची मेंबरशिप एका वर्षासाठी देत ​​आहे.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Poco चा नवीन टॅबलेट Poco Pad 5G नुकतेच भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Xiaomi च्या सब-ब्रँड Poco चा हा 5G टॅबलेट अनेक पॉवरफुल फीचर्ससह लाँच करण्यात आला आहे. लक्षात घ्या की, हा टॅबलेट जागतिक बाजारपेठेत आधीच सादर करण्यात आला आहे. या टॅबलेटच्या भारतीय व्हेरिएंटमध्येही जागतिक प्रकारातील सर्व फीचर्स आहेत. जाणून घेऊयात Poco Pad 5G ची भारतीय किंमत आणि सर्व तपशील-

Also Read: लेटेस्ट HMD Crest 5G स्मार्टफोनवर भारी Discount उपलब्ध, बजेट स्मार्टफोन आणखी स्वस्तात खरेदी करण्याची संधी

Poco Pad 5G ची किंमत

Poco चा हा टॅबलेट दोन व्हेरिएंटसह लाँच करण्यात आला आहे. या टॅबलेटचा बेस व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. बेस व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये आहे. तर, त्याचा टॉप व्हेरिएंट 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजने सुसज्ज आहे, जो 24,999 रुपयांना येतो.

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या टॅबलेटची विक्री 27 ऑगस्ट 2024 पासून लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर सुरू होईल. एवढेच नाही तर, यामध्ये कंपनी ‘Times Prime’ ची मेंबरशिप एका वर्षासाठी देत ​​आहे. ऑफर्सबद्दल बोलयचे झाल्यास, यात SBI, HDFC, ICICI बँक कार्डवर 3000-3000 रुपयांची सूट मिळेल.

Poco Pad 5G

‘Times Prime’ मेंबरशिप

टाइम्स प्राइम ॲप हे एक खास लाइफस्टाइल मेंबरशिप आहे. यामध्ये सदस्यांना Disney+ Hotstar आणि इतर TOI+, ET Prime, PharmEasy, इत्यादी सारख्या 20+ प्रीमियम मेंबरशिपचा ऍक्सेस मिळतो. तर, सदस्यांना Myntra, Chaayos, Google One आणि बरेच काही सारख्या 40+ ब्रँड्सचे विशेष फायदे देखील मिळतात.

Poco Pad 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Poco Pad 5G चे डिझाइन अलीकडेच लाँच झालेल्या Redmi Pad Pro सारखे आहे. या टॅबलेटची स्क्रीन 12.1 इंच लांबीची आहे, ज्याचे रिफ्रेश रेट 120Hz इतके आहे. यासह, तुम्हाला स्टायलस आणि कीबोर्डचे सपोर्ट देखील मिळेल. चांगल्या परफॉर्मन्ससाठी, हा टॅबलेट स्नॅपड्रॅगन 7s Gen 2 प्रोसेसरसह येतो. हे Android 14 वर आधारित HyperOS वर चालते.

त्याबरोबरच, उत्तम फोटोग्राफीसाठी, टॅबलेटच्या मागील बाजूस 8MP कॅमेरा आणि समोर 8MP फ्रंट कॅमेरा आहे. याशिवाय, पॉवरसाठी या टॅबलेटमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 10,000mAh बॅटरी मिळेल. तर, चांगल्या ऑडिओसाठी त्याच्या समोर क्वाड स्पीकर्स दिलेले आहेत, जे डॉल्बी ATMOS ला सपोर्ट करतात. हा टॅबलेट 5G कनेक्टिव्हिटीसह येतो.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :