Most Affordable 5G Device: Jio नाही तर Airtel आणणार भारतात सर्वात स्वस्त फोन? वाचा सर्व डिटेल्स। Tech News 

Most Affordable 5G Device: Jio नाही तर Airtel आणणार भारतात सर्वात स्वस्त फोन? वाचा सर्व डिटेल्स। Tech News 
HIGHLIGHTS

देशातील सर्वात स्वस्त 5G फोनसाठी Airtel ने POCO सोबत पार्टनरशिप केली आहे.

Poco India च्या कंट्री हेड यांनी माहिती दिली की, ते लवकरच स्वस्त 5G डिवाइस भारतात लाँच करतील.

POCO India या महिन्याच्या अखेरीस POCO X6 Neo लाँच करण्यासाठी सज्ज

भारतीय ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी पुढे आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, सर्वात स्वस्त 5G फोन भारतात लवकरच दाखल होणार आहे आहे. काही दिवसांपूर्वी Jio सर्वात स्वस्त 5G फोन लाँच करेल, अशा बातम्या सुरु होत्या. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हा Jio Phone 5G नसून ‘Airtel मोबाईल’ असेल.

होय, देशातील सर्वात स्वस्त 5G फोनसाठी Airtel ने POCO सोबत पार्टनरशिप केली आहे. Poco आणि Airtel यांच्यातील भागीदारीबद्दल माहिती Poco इंडियाचे प्रमुख हिमांशू टंडन यांनी दिली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात संपूर्ण डिटेल्स.

airtel 5g
airtel 5g

POCO Airtel 5G ची पार्टनरशिप

वर सांगितल्याप्रमाणे, Poco India चे कंट्री हेड हिमांशू टंडन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X म्हणजेच ट्विटरद्वारे माहिती दिली आहे की, ते स्वस्त 5G डिव्हाइसवर काम करत आहेत. यासाठी टेलिकॉम ऑपरेटर Airtel सोबत पार्टनरशिप करण्यात आहे. POCO Airtel भागीदारीतुन हे अद्याप स्पष्ट झालेले नाही की, यासह नवीन Poco फोन स्मार्टफोन केला जाईल की पूर्वीपासून उपलब्ध असलेल्या Poco स्मार्टफोनसह विशेष Airtel आवृत्ती आणली जाईल.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट हे प्रोडक्ट स्मार्टफोन किंवा इतर कोणतेही स्मार्ट गॅझेट आहे की नाही याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. पण, येत्या काळात आपल्याला विद्यमान C-सिरीज फोन दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे, जो नेटवर्क Airtel मध्ये लॉक केला जाईल.

POCO चा आगामी स्मार्टफोन

Poco X6 Neo could launch in India next week: What to expect
Poco X6 5G

POCO India या महिन्याच्या अखेरीस POCO X6 Neo लाँच करण्यासाठी सज्ज होत आहे. हा फोन लोकप्रिय सिरीजअंतर्गत POCO X6 आणि POCO X6 Pro मध्ये सामील करण्यात येईल. हा फोन अलीकडेच चीनमध्ये लाँच झालेल्या Redmi Note 13R Pro चा रीब्रँड असावा, असा अंदाज सांगितला आहे. भारतीय ग्राहकांसाठी या फोनची किंमत 16,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची अपेक्षा केली जात आहे.

आगामी POCO X6 Neo च्या लीक झालेल्या रेंडरमध्ये सेल्फी शूटरसाठी सेंटर-पंच-होल कटआउट, एक बॉक्सी चेसिस आणि बॅक टू हाऊस ड्युअल कॅमेरा सेन्सरवर एक मोठा कॅमेरा आयलंड दर्शविला गेला. येत्या काही दिवसांत फोनबद्दल अधिक तपशील पुढे येतील.

Jio Phone 5G

Reliance Jio ने आणलेला Jio Phone 5G हा भारतातील सर्वात स्वस्त 5G मोबाईल असू शकतो. लेटेस्ट अहवालानुसार, Jio Phone 5G ची किंमत सुमारे 8,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले होते. क्वालकॉमच्या अधिकाऱ्याने MWC 2024 मध्ये एक विधान दिले आहे की, ते भारतीय बाजारपेठेसाठी एक विशेष चिपसेट बनवत आहे जे अंदाजे 8,200 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या मोबाईलसाठी 5G सपोर्ट प्रदान करेल. हा चिपसेट Jio 5G फोनमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo