Poco M6 Pro 5G भारतात नवीन अवतारात झाला लाँच, कमी किमतीत मिळतील अप्रतिम फीचर्स

Poco M6 Pro 5G भारतात नवीन अवतारात झाला लाँच, कमी किमतीत मिळतील अप्रतिम फीचर्स
HIGHLIGHTS

POCO M6 Pro 5G स्मार्टफोन 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलमध्ये लाँच

POCO M6 Pro 5G च्या या मॉडेलची किंमत सुमारे 11,999 रुपये आहे.

ICICI बँकेकडून 1000 रुपये सूट दिली जात आहे.

Poco M6 Pro 5G हा स्मार्टफोन अलीकडेच म्हणजे गेल्या महिन्यातच भारतीय बाजारात लाँच करण्यात आला होता. ही Redmi Note 12R ची रीब्रँडेड आवृत्ती आहे, जी चीनी बाजारात लाँच करण्यात आली होती. Poco M6 Pro 5G स्मार्टफोन मागील महिन्यात लाँच दरम्यान दोन रॅम आणि स्टोरेज मॉडेलमध्ये सादर करण्यात आला होता. मात्र, हा स्मार्टफोन आता नव्या अवतारात लाँच करण्यात आला आहे. 

होय, हा फोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आणि 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलमध्ये सादर करण्यात आला होता. मात्र, POCO M6 Pro 5G स्मार्टफोन 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलमध्ये देखील सादर करण्यात आला आहे. त्याचा नवा अवतार बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

poco m6 pro 5g

Poco M6 Pro 5G ची भारतीय किंमत 

POCO M6 Pro 5G च्या या मॉडेलची किंमत सुमारे 11,999 रुपये आहे. या फोनची किंमत आता 10,999 रुपयांवरून 12,999 रुपयांपर्यंत आहे. नवीन अवतारासह फोनमध्ये तीन रॅम आणि स्टोरेज मॉडेल उपलब्ध आहेत. याशिवाय फोनची पहिली सेल आज म्हणजेच 14 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवर सुरु झाली आहे. 

Flipkartवर जाऊन तुम्ही ते खरेदी करू शकता. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI बँकेकडून 1000 रुपये सूट दिली जात आहे. 

Poco M6 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसीफिकेशन्स 

poco m6 pro 5g specs

POCO M6 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.79-इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. याशिवाय, फोनमध्ये Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. यासह  फोन सहज दिवसभर वापरण्यासाठी, शार्प फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी स्मूथ परफॉरमन्स ऑफर करतो. या फोनमधील स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते.

फोनमध्ये IP53 रेटिंग देखील आहे, ज्यामुळे ते वॉटर आणि डस्ट प्रूफ बनते. याशिवाय, POCO M6 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा, 2MP डेप्थ सेन्सर आणि सेल्फीसाठी 8MP फ्रंट कॅमेरा देखील आहे. हा फोन Android 13 वर चालतो, याशिवाय यात MIUI 14 चा लेयर आहे. सिक्योरिटीसाठी फोनच्या पॉवर बटनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo