POCO ने ऑगस्ट महिन्यात आपली M सीरीज POCO M6 Pro 5G लाँच केली. त्यावेळी, फोनचे 4GB RAM + 64GB आणि 6GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेल लाँच करण्यात आले. मात्र यानंतर POCO M6 Pro स्मार्टफोनचे 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल देखील सप्टेंबर महिन्यात सादर करण्यात आले. आता कंपनीने फोनचे 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेल लाँच केले आहे. हा फोन आज दुपारी 12 वाजता Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे.
हे सुद्धा वाचा: Noise ColorFit Pro 5 स्मार्टवॉच सिरीज हेल्थ आणि अप्रतिम फीचर्ससह भारतात लाँच, किंमत 3,999 रुपयांपासून सुरु
कंपनीने POCO M6 Pro 5G चे 8GB RAM आणि 256GB स्टोरेज मॉडेल देखील Flipkart द्वारे उपलब्ध करून दिले आहे. POCO M6 Pro स्मार्टफोनचे 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेल 14,999 रुपये किमतीत लॉन्च करण्यात आले होते. सध्या HDFC बँक आणि ICICI बँक क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार करण्यासाठी फोनवर 2000 रुपयांची त्वरित सूट दिली जात आहे.
हा फोन फॉरेस्ट ग्रीन आणि पॉवर ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी Flipkart वर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या POCO फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.79-इंच लांबीची स्क्रीन देण्यात आली आहे. त्याबरोबरच, डिस्प्लेच्या संरक्षणासाठी गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन आहे. इतकेच नाही तर, या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 प्रोसेसर देखील उपलब्ध आहे. फोनमध्ये 4GB/6GB/8GB रॅम आहे, याशिवाय हा फोन 64GB/128GB/256GB स्टोरेज मॉडेलमध्ये येतो.
फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, LED फ्लॅशसह 2MP डेप्थ सेन्सर आहे. फोनमध्ये 5MP सेल्फी कॅमेरा देखील आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी देखील उपलब्ध आहे. हा 18W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आला आहे, याशिवाय फोनमध्ये टाइप C पोर्टची सुविधा देखील आहे. काही मूलभूत कार्यांसह ही बॅटरी दोन दिवस टिकण्याची क्षमता ठेवते.