नवा POCO M6 Plus 5G स्मार्टफोन भारतात लाँच! किंमत केवळ 11,999 रुपये, पहा फीचर्स
POCO ने आपला नवीन स्मार्टफोन POCO M6 Plus 5G भारतीय बाजारात लाँच केला.
POCO M6 Plus 5G स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे.
POCO M6 Plus 5G स्मार्टफोन दोन्ही व्हेरिएंट बजेट रेंजमध्ये उपलब्ध आहेत.
बजेट स्मार्टफोन्स देण्यासाठी प्रसिद्ध चीनी स्मार्टफोन कंपनी POCO ने आपला नवीन स्मार्टफोन POCO M6 Plus 5G भारतीय बाजारात लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा एक फोन बजेट स्मार्टफोन आहे. POCO India चे कंट्री हेड हिमांशू टंडन यांनी Digit आणि टाइम्स इंटरनेटसाठी POCO चा हा नवीन फोन अनबॉक्स केला आहे. याशिवाय, त्यांनी या फोनच्या बेस मॉडेलची म्हणजेच सुरुवातीची किंमत 11,999 रुपये असल्याचेही सांगितले आहे.
POCO M6 Plus 5G ची भारतीय किंमत
Break speed limits, make style statements and snap your dreams into reality with the powerful #POCOM6Plus5G
— POCO India (@IndiaPOCO) July 26, 2024
Know More👉https://t.co/vUv18WWpEt#SpeedStyleSnap #POCOIndia #POCO #MadeOfMad #Flipkart pic.twitter.com/j12qxeYJ8d
POCO M6 Plus 5G स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. तुम्ही POCO M6 Plus चे 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल 11,999 रुपयांना खरेदी करू शकता. तर, तुम्ही फोनचे 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल 13,499 रुपयांमध्ये खरेदी करण्यास सक्षम असाल. हा फोन तुम्ही मिस्टी लॅव्हेंडर, आइस सिल्व्हर आणि ग्रेफाइट ब्लॅक या तीन कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकता.
POCO M6 Plus 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
POCO M6 Plus 5G फोनच्या बॉडीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये ग्लास बॅक उपलब्ध आहे. याशिवाय, फोनच्या साइड पॉवर बटणवर तुम्हाला फिंगरप्रिंट सेंसर मिळतो. या फोनचे वजन फक्त 205 ग्रॅम आहे. प्लॅस्टिक बॉडी असल्यामुळे या फोनचे वजन इतके कमी होते. याशिवाय, फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.79-इंच लांबीचा FHD+ डिस्प्ले आहे. डिस्प्लेच्या संरक्षणासाठी यात गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन देखील आहे. POCO चा हा फोन पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी IP53 सर्टिफिकेशनसह येतो.
कॅमेरा सेक्शनबद्दल सविस्तर बोलायचे झाल्यास, POCO M6 Plus स्मार्टफोन मध्ये डुअल कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये 3x इन-सेन्सर झूम आणि 2MP मॅक्रो लेन्ससह 108MP मुख्य कॅमेरा आहे. सेल्फी इत्यादीसाठी फोनमध्ये 13MP फ्रंट कॅमेरा देखील आहे. कॅमेराचा 108MP मोड हाय डिटेल्स फोटो घेण्यास सक्षम आहे. याशिवाय, फोनमध्ये 3x इन-सेन्सर झूम देखील आहे, त्यासह तुम्ही क्लोज-अप शॉट्स घेऊ शकता.
एवढेच नाही तर, फोनच्या कॅमेऱ्यात स्मार्ट नाईट मोड देखील उपलब्ध आहे. फोनमध्ये क्लोज-अप शॉट्ससाठी मॅक्रो पर्याय देखील आहे. यामध्ये मॅन्युअल सेटिंगसाठी प्रो मोड आणि वाइड व्ह्यू आणि वॉटरमार्क इत्यादीसाठी सर्वोत्तम पॅनोरामा देखील आहे. कॅमेराच्या इतर फीचर्समध्ये तुम्हाला ब्युटीफाई, HDR, गुगल लेन्स, व्हॉईस शटर, आर्ट फ्रेमिंग आणि स्टिकर्स इ. सुविधा देखील मिळतात.
फोनमध्ये पॉवरसाठी तुम्हाला 5030mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह येते. तर, कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये 5G सोबत तुम्हाला 4G LTE Dual Band WiFi आणि 3.5mm ऑडिओ जॅक देखील मिळतो.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile