POCO M6 Plus 5G Sale: लेटेस्ट स्मार्टफोनची पहिली सेल आजपासून होणार सुरु, पहा किंमत आणि Best ऑफर्स 

POCO M6 Plus 5G Sale: लेटेस्ट स्मार्टफोनची पहिली सेल आजपासून होणार सुरु, पहा किंमत आणि Best ऑफर्स 
HIGHLIGHTS

POCO चा लेटेस्ट स्मार्टफोन POCO M6 Plus 5G फोन गेल्या आठवड्यात लाँच करण्यात आला.

Flipkart वर दुपारी 12 वाजता POCO M6 Plus 5G फोनची सेल सुरु होईल.

पहिल्या सेलदरम्यान POCO M6 Plus 5G स्मार्टफोनवर 1000 रुपयांची सूट आणि अधिक ऑफर्स देखील मिळतील.

POCO M6 Plus 5G Sale: बजेट स्मार्टफोन सादर करण्यासाठी प्रसिद्ध कंपनी POCO चा लेटेस्ट स्मार्टफोन POCO M6 Plus 5G फोन गेल्या आठवड्यात लाँच करण्यात आला आहे. आज म्हणजेच 5 ऑगस्ट 2024 रोजी या डिव्हाइसची पहिली सेल भारतात सुरु होणार आहे. होय, प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर दुपारी 12 वाजता या फोनची सेल सुरु होईल. ज्यामध्ये नवीनतम फोन तुम्हाला उत्तम ऑफर्ससह खरेदी करता येईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात या फोनची किंमत, ऑफर आणि स्पेसिफिकेशनबद्दल सर्व तपशील-

Also Read: तब्बल 180MP कॅमेरासह Honor Magic 6 Pro फोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व तपशील

POCO M6 Plus 5G ची किंमत आणि ऑफर

लेटेस्ट Poco M6 Plus फोन 6GB + 128GB आणि 8GB + 128GB स्टोरेज अशा दोन वेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत अनुक्रमे 11,999 रुपये आणि 14,499 रुपये ठेवण्यात आली आहे. पहिल्या सेलदरम्यान उपलब्ध असणाऱ्या ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला स्मार्टफोनवर 1000 रुपयांची सूट मिळेल. याव्यतिरिक्त, हँडसेट नो-कॉस्ट EMI आणि 4,500 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरसह देखील हा खरेदी केला जाऊ शकतो.

POCO M6 PLUS 5G FIRST SALE IN INDIA

आम्ही तुम्हाला सांगतो की, POCO M6 Plus 5G फोन Flipkart वरून मिस्टी लॅव्हेंडर, आइस सिल्व्हर आणि ग्रेफाइट ब्लॅक या 3 कलर ऑप्शन्समध्ये सादर केला जाईल.

POCO M6 Plus 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Poco ने POCO M6 Plus 5G स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.79 इंच लांबीचा LCD FHD+ डिस्प्ले दिला आहे. प्रोटेक्शनसाठी या डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास बसवण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर, 8GB पर्यंत रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज आहे. तूम्हाला स्टोरेजचा विस्तारही करता येईल.

POCO M6 Plus 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फोटोग्राफीसाठी, POCO M6 Plus मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये पहिला 108MP मेन लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. तर, सेल्फी व्हिडिओ कॉलिंगसाठी डिव्हाइसमध्ये 13MP कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवरसाठी, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हे डिव्हाइस Android 14 वर कार्य करते.

इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या हँडसेटमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुविधा आहे. फोनला धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP53 रेटिंग मिळाले आहे. उत्तम कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनमध्ये ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ आणि USB टाइप-C पोर्ट आहे. तसेच, फोनमध्ये पॉवरफुल स्पीकर देखील आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo