Poco M6 5G स्मार्टफोनच्या भारतातील लाँच डेटची पुष्टी करण्यात आली आहे. ही Poco M6 सिरीजची नवीनतम आवृत्ती असेल. या सीरीज अंतर्गत कंपनीने आधीच Poco M6 Pro 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन सध्याच्या Redmi 13C 5G चे रीब्रँडेड व्हर्जन असणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या Poco फोनचे फीचर्स रेडमी फोन सारखेच असतील. चला तर मग बघुयात, Poco M6 भारतात कधी होणार लाँच?
कंपनीने Poco India च्या अधिकृत X (Twitter) हँडलद्वारे Poco M6 5G स्मार्टफोनच्या भारतीय लाँच डेटची पुष्टी केली आहे. हा फोन भारतात 22 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता लाँच होईल. एवढेच नाही तर, लाँच डेटसोबतच कंपनीने एक टीझर पोस्टर देखील जारी केला आहे. या टीजरमध्ये तुम्ही Poco फोनची पहिली झलक बघायला मिळत आहे.
वर सांगितल्याप्रमाणे, Redmi 13C ची ही 5G ची रीब्रँडेड आवृत्ती असेल. अशा परिस्थितीत, या फोनचे फीचर्स रेडमी फोनसारखे असू शकतात. तर, Poco M6 5G फोनमध्ये 6.74 इंच लांबीचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz असेल. प्रक्रियेसाठी यात MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर असू शकतो. स्टोरेजसाठी यामध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज उपलब्ध असेल.
फोटोग्राफीसाठी Poco M6 5G च्या कॅमेरा सेक्शनमध्ये फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50MP चा असण्याची शक्यता आहे. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात येईल, जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येण्याची शक्यता आहे.