5 सप्टेंबरला लाँच होणार Poco M5, लॉन्च होण्यापूर्वीच फ्लिपकार्टवर पेज लाइव्ह, जाणून घ्या फीचर्स

5 सप्टेंबरला लाँच होणार Poco M5, लॉन्च होण्यापूर्वीच फ्लिपकार्टवर पेज लाइव्ह, जाणून घ्या फीचर्स
HIGHLIGHTS

Poco M5 स्मार्टफोन भारतात 5 सप्टेंबरला लाँच होणार

POCO M5 चे लँडिंग पेज आता भारतीय रिटेलर साइट Flipkart वर उपलब्ध

POCO M5 तीन स्टोरेज पर्यायांमध्ये येण्याची शक्यता

POCO M5 आणि POCO M5s 20:00 PM (GMT+8) वाजता जागतिक बाजारपेठेत अधिकृत होणार आहेत. रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की केवळ M5 भारतात रिलीज केला जाईल. POCO M5 चे लँडिंग पेज आता भारतीय रिटेलर साइट Flipkart वर उपलब्ध आहे. फोन भारतात आणि जागतिक स्तरावर एकाच वेळी लाँच केला जाईल, हे लिस्टिंगद्वारे कन्फर्म झाले आहे. भारतीय लॉन्च इवेंट 5 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5:30 वाजता होईल. याशिवाय, मायक्रोसाइटने M5 ची प्रमुख फिचर्स आणि डिझाइन उघड केले आहे.

हे सुद्धा वाचा : भारीच की ! JioBook लॅपटॉप लवकरच बाजारात दाखल होणार, AGM 2022 मध्ये झाली घोषणा

 POCO M5 चे संभावित फीचर्स

POCO M5 मध्ये फ्रंटला टीयरड्रॉप नॉच डिस्प्ले येऊ शकतो. त्याच्या मागच्या पॅनलला लेदरसारखे टेक्सचर आहे. कॅमेरा ब्लॉकमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप, एक LED फ्लॅश आणि POCO ब्रँडिंग आहे. POCO इंडियाचे प्रमुख हिमांशू टंडन यांनी केलेल्या ट्विटमध्ये पाहिल्याप्रमाणे, POCO M5 किमान येलो आणि ब्लु कलरमध्ये उपलब्ध असेल, हे समोर आले आहे. 

याव्यतिरिक्त, POCO ने फक्त पुष्टी केली आहे की, POCO M5 Helio G99 ने सुसज्ज असेल, जी एक नवीन 6nm MediaTek चिप आहे. POCO M5 हा फोन 4GB RAM + 64GB स्टोरेज, 4GB RAM + 128GB स्टोरेज आणि 6GB RAM + 128GB स्टोरेज या तीन पर्यायांमध्ये येण्याची शक्यता आहे. 

 अफवांवर विश्वास ठेवला तर, POCO M5 मध्ये 6.58-इंच लांबीचा LCD पॅनेल असेल. जो फुल HD+ रिझोल्यूशन ऑफर करतो. यामध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे. सिक्योरिटीसाठी फोन साईड-फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनरसह सुसज्ज असेल. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo