Poco ने Marvel सोबत भागीदारी करून POCO F6 Deadpool Edition भारतीय बाजारात लाँच केले आहे. या फोनची विशेषता म्हणजे मागच्या पॅनलवर डेडपूल आणि वॉल्व्हरिन डिझाइन पाहायला मिळणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे उपकरण खास भारतासाठी एक्सक्लुसिव्ह ठेवण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊयात POCO F6 Deadpool Edition ची किंमत, उपलब्धता आणि सर्व तपशील-
Also Read: आगामी Motorola Edge 50 ची भारतीय लाँच डेट कन्फर्म! मिळेल स्मार्ट वॉटर टच फिचर, बघा विशेषता
POCO F6 Deadpool Limited Edition च्या 12GB रॅम + 256GB व्हेरिएंटची किंमत भारतात 33,999 रुपये आहे. हे स्टोरेज वेरिएंटमध्ये सादर केले आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 7 ऑगस्टपासून Flipkart वर सुरू होणार आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, वापरकर्त्यांना HDFC बँक, ॲक्सिस बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डसह फोनवर 4,000 रुपयांपर्यंतची झटपट सूट मिळेल.
POCO F6 Deadpool Edition मध्ये लाल कलरचा बॅक पॅनल आहे. डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास, फोनला डेडपूल आणि वूल्व्हरिन लूक देण्यात आला आहे. कॅमेऱ्याजवळील LED फ्लॅश रिंगमध्ये डेडपूलचे डोळे देखील चित्रित केले आहेत. डिव्हाइसचे एजेस ब्लॅक कलरचे आहेत, ज्या रेड-ब्लॅक थीमला प्रतिबिंबित करतात. त्याबरोबरच, फोन बॉक्समध्ये चार्जरवर डेडपूलचा लोगो आहे आणि सिम इजेक्टर पिन डेडपूलच्या मास्कच्या आकारात दिसतात.
POCO F6 Deadpool Edition मध्ये 6.67 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शन बसवण्यात आले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8S Gen 3 चिपसेट उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी, यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50MP प्राथमिक आणि 8MP अल्ट्रावाइड सेन्सर आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 20MP लेन्स मिळेल. पॉवरसाठी फोनमध्ये 5,000mAh बॅटरी 90W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह सज्ज आहे.